राजकिय

RSS ने मविआ ची रणनीती उलथवून लावल्यानेच पवार साहेब RSS चे मुरिद

Spread the love

पवार साहेब समजूतदार आहेत – फडणवीस 

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

                     विधानसभा जीवडणुकीत महायुती आणि भाजपा ला मिळालेल्या यशामागे आरएसएस चा खूप मोठा वाटा असल्याचे शरद पवार यांनी बोलून दाखवले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना RSS च्या प्रयत्नांमुळेच आम्ही मविआ ने लोकसभेत पसरवलेले नेरेटिव्ह दूर करण्यात यशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. सोबत त्यांनी पवार साहेब समजूतदार आहेत असे त्यांचे कौतूक सुद्धा केले आहे.

फडणवीस यांनी म्हटलं की, शरद पवारांचं हे विधान आरएसएसच्या यशाचा परिणाम आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मविआकडून फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं. त्याविरोधात आरएसएसची भूमिकासुद्धा महत्त्वाची राहिली.

विधानसभा निवडणुकीत आम्ही आरएसएसला विनंती केली होती की, राष्ट्रीय शक्तीला अराजकाविरोधात एकत्र यायला हवं. आरएसएसच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जोडलेल्या लोकांनी आपआपली भूमिका पार पाडली आणि यामुळे आम्ही खोट्या प्रचाराला संपवण्यात यशस्वी राहिलो. त्यामुळे विधानसभेचे निकाल हे लोकसभेपेक्षा वेगळे लागल्याचंही फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी शरद पवार यांच्या समजुतदारपणाचं कौतुक केलं. ते म्हणाले की, शरद पवार यांना हे जाणवलं की आरएसएसने कशा प्रकारे विरोधकांच्या प्रचाराला एका क्षणात संपवलं. तसंच शरद पवारांनी आरएसएसचं कौतुक करणं हे राजकीय पाऊल असू शकतं. ज्यात ते आरएसएसचा प्रभाव स्वीकारत आहेत असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

शरद पवार हे खूप समजुतदार आहेत. त्यांनी नक्की अभ्यास केला असेल की कसे आम्ही वातावरण निर्माण करत होतो आणि एक मिनिटात सगळं संपलं. त्यांना जाणीव झाली असेल की हे लोक फक्त राजकारण करत नाहीयत तर राष्ट्रहिताचंही काम करतायत. त्यामुळे त्यांनी असं विधान केलं असावं असं फडणवीस यांनी म्हटलं.

फडणवीस पुढे असं म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकतं. कधी हा विचार नका करू की काही होणार नाही. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे आले. राजकारणात असं काहीही होऊ शकतं. याचा अर्थ असा नाही की असं होणार नाही. राजकारणात कधी कधी आपल्या प्रतिस्पर्धींचं कौतुकही करावं लागतं. त्यामुळेच पवार साहेबांनी असं केलं असेल. २०१९ ते २०२४ या कालावधीत बदललेल्या राजकरणातील समीकरणानंतर मी एकच गोष्ट शिकलो की कधीही काहीही होऊ शकतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close