बिबट्या दुम दबाकर भागा ; गावठी कुत्र्याने बिबट्याची जिरवली
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात. यात काही जंगली प्राण्यांच्या शिकारीचे देखील असतात. सहसा गावात शिरलेल्या बिबट्या कडून कुत्र्यची शिकार केला गेल्याचे काही व्हिडीओ समाज माध्यमांवर असतात. पण एका गावठी कुत्र्याने बिबट्या ची चांगलीच जिरवल्याची आणि पळता भुई थोडी केल्याची घटना घडली आहे.
गावठी कुत्रे धोकादायक मानले जातात.मात्र, त्यांच्या कुळाची गुणवत्ता त्यांच्या आई-वडिलांच्या वंशावर अवलंबून असते. ही कुत्री स्वभावतः निष्ठावान, शक्तिशाली आणि शांत मानली जाते. पण ते जितके शांत असतात, वाघ आणि बिबट्यासारखे प्राणी दिसल्यावर तेवढेच आक्रमक होतात. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला या कुत्र्याचे रौद्र रूप पाहायला मिळेल.
कुत्रा आणि बिबट्याची लढाई…
या व्हिडिओमध्ये साखळीने बांधलेला एक गावठी कुत्रा बिबट्याशी लढताना दिसत आहे. या संपूर्ण क्लिपमध्ये, हा कुत्रा बिबट्याला एकदाही त्याच्यावर वर्चस्व गाजवू देत नाही. जसा बिबट्या प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, तसा तो त्याला आणखी वाईट पद्धतीने मारतो. सुमारे 17 सेकंदात हा कुत्रा बिबट्याला अनेक वेळा उचलतो आणि मारतो.
@askbhupi नावाच्या एका यूजरने X वर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा कुत्रा बिबट्याचा शिकारी, तो बांधलेला होता नाहीतर त्याने बिबट्याचे तुकडे तुकडे केले असते, असं कॅप्शन देण्यात आलंय. व्हिडिओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो अधिक लाईक्स मिळाले आहेत. या कुत्र्याची ताकद पाहून अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये त्याचे कौतुकही केले आहे.
या व्हिडिओमध्ये कुत्र्याला बिबट्याशी लढताना पाहून युजर्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले – गावठी कुत्रे वेगळेच असतात, त्यांना नुसते पाहूनच कोणाचीही घाबरगुंडी उडू शकते. आणखी एका यूजरने सांगितले की हा कुत्रा तिबेटी मास्टिफ जातीचा आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले की, तो तिबेटी मास्टिफसारखा दिसतो. तसेच, बिबट्या अजून तेवढा मोठा नाही. चौथ्या यूजरने गंमत म्हणून म्हटले की, आजकाल कुत्र्यांना चांगले जेवण मिळत आहे आणि बिबट्याची अवस्था वाईट आहे.