अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ भद्रावती तालुका कार्यकारणी गठीत
ग्रामीण खेडी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ -रवींद्र तिराणिक
अध्यक्षपदी गणेश पेंदरे, उपाध्यक्षपदी किशोरकांत चौधरी तर कार्याध्यक्ष पदी प्रा. भूषण वैद्य सचिव पदी सौरभ चामाटे यांची निवड.
भद्रावती / प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची विशेष तातडीची बैठक महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हाकार्याध्यक्ष किशोर पत्तीवार यांच्या मार्गदर्शनात श्री साई आयटीआय (सेमिनार हॉल )भद्रावती येथे आयोजित केली होती.
सदर बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली .प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख, जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक यांनी विशेष मार्गदर्शन करीत, ग्रामीण खेडी खऱ्या अर्थाने लोकशाहीतील चौथा आधारस्तंभ असून ,सामाजिक व पत्रकारिते मधील केंद्रबिंदू आहे .त्याचा विचार कुठेच होताना दिसत नाही . हीच खरी लोकशाहीतील चौथ्या आधारस्तंभाची शोकांतिका आहे . असे स्पष्ट मनोगत याप्रसंगी मांडले . पत्रकारिता क्षेत्रामध्ये नव्या दमाने नव्या उत्साहाने काम करणाऱ्या होतकरू तरुणांना संधी देण्याचे काम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने हाती घेतले असून, त्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून अभ्यासगत केले जाणार आहे . असे सूचक विधान या बैठकी प्रसंगी केले. यावेळी भद्रावती तालुका कार्यकारणी व ग्रामीण प्रभाग प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले . सदर नियोजित बैठकीत सर्वानुमते कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष गणेश पेंदरे उपाध्यक्ष- किशोरकांत चौधरी, कार्याध्यक्ष प्रा .भूषण वैद्य ,सचिव सौरभ चामाटे, सहसचिव वासुदेव शेंडे, कोषाध्यक्ष प्रशांत बरडे तालुका संपर्कप्रमुख रवींद्र कोंगरे, शहर संपर्कप्रमुख आशिष मुंजे (छायाचित्रकार), ग्रामीण विभागीय संपर्कप्रमुख शंकर भरडे, तालुका संघटक अनंता मांढरे, ग्रामीण विभाग संघटक दिलीप वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख श्रीपाद बाकरे ,सह प्रसिद्ध प्रमुख गणेश नालमवार (छायाचित्रकार), दीपक केवटे, तालुका शहर व ग्रामीण कार्यकारणी -सदस्य योगेश मोहितकर ,मिथुन मसराम, अनिकेत माथनकर ,दशरथ चेंदे राजू नागोसे , महेंद्र वालदे, दिनेश पेंदरे, अरुण चिंचपाले आदींची निवड करण्यात येऊन कार्यकारणी घोषित करण्यात आली. प्रसंगी अभिनंदनाचा ठराव पारित करून, सर्व नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारिणीचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर पत्तीवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.