अपघात

ओम्नी आणि मिक्सर मध्ये धडक ; ११ प्रवाशांचा मृत्यू 

Spread the love
एकाच कुटुंबातील तीन मुलींचा समावेश 
मुरबाड /विशेष प्रतिनिधी 
               मुरबाड वरून कल्याण कडे जाणाऱ्या ओम्नी आणि मिक्सर चा कल्याण अहिल्यानगर महामार्गावर अपघात होऊन ११ लोक दगावले आहेत. यात एकाच कुटुंबातील तीन मुलींचा समावेश आहे. ओवरटेक करताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींपैकी अनेकजण मुरबाड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील मृतांची नावे आता समोर आली आहेत.

आज सकाळी झालेल्या अपघाताची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस आणि टिटवाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील तीन मुलींचाही मृत्यू झाला आहे. तसेच महसूल विभागातील कर्मचारी देखील दुर्घटनेत ठार झाल्याचे समोकर आले आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना झाल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.

स्थानिक नागरिक आक्रमक

दरम्यान, या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पूल पूर्णपणे सुरक्षित नसतानाही घाईघाईत सुरू करण्यात आल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच, अपघातग्रस्त ओम्नी टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. सध्या या अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close