Uncategorized

से.फ.ला. हायस्कूल येथील शिक्षक प्रवीण पनपालिया जिल्ह्यातून प्रथम तसेच राम बावस्कर यांचा तालुक्यातून प्रथम क्रमांक..

Spread the love

..

धामणगाव रेल्वे- तालुका प्रतिनिधी

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र द्वारा राज्यातील शिक्षकांकरिता दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक
माध्यमिक गटातून प्रवीण पणपालिया यांनी धामणगाव तालुका तसेच अमरावती जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच सहावी ते आठवी या गटातून तालुकास्तरावर राम बावस्कर सर यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे..प्रवीण पनपालीया यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी पडेल असे अत्यंत कठीण वाटणाऱ्या जी.एस.टी. विषयावर वर शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती केली.तसेच राम बावस्कर यांनी विज्ञानातील अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात विद्यार्थांना समजावे यासाठी विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती केली.
त्यांच्या या यशाकरिता विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्रचार्य प्रा.प्रदीप मानकर, पर्यवेक्षक अनिल लाहोटी तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close