राजकिय

मोर्शी मधील सर्वच केंद्रावर बीजेपी ची मुसंडी

Spread the love

मोर्शी / ओंकार काळे
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा चे उमेश उर्फ चंदू यावलकर यांनी जोरदार विजय मिळवला असून जवळपास सर्वच मतदार केंद्रावर लीड घेतल्याचे दिसून येते. मोर्शी शहरात सुद्धा त्यांनी 11 हजार 355 मते मिळवून आपली लीड कायम ठेवली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोर्शी शहरातील मनीमपूर या गावासह 30 केंद्रावर मतदान पार पडले. यामध्ये 20 हजार 788 मतदारांनी मतदान केले. मोर्शी शहरातील सर्व केंद्रावर चंदू यावलकर यांना 11 हजार 355 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार गिरीश कराळे यांना 3 हजार 757 मते, अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांना 2 हजार 437 मते तर आमदार देवेंद्र भुयार यांना फक्त 1 हजार 955 मते मिळाली.
मोर्शी चे उमेदवार विपुल भडांगे यांना मोर्शी शहरातून फक्त 253 मते मिळाली.
यावलकर यांना मोर्शी शहरातील सर्वच मतदान केंद्रावर लीड मिळाली असून त्यांना शहरातील 8 मतदान केंद्रावर 500 च्या वर मते मिळाली तर उर्वरित उमेदवारांना मोर्शी शहरातून एकाही मतदान केंद्रावर 500 मतदानाचा आकडा गाठता आला नाही.
मनीमपूर वगळता शहरातील सर्वच केंद्रावर यावलकर यांना शंभर च्या वर मते मिळाली तर कराळे यांना 15 केंद्रावर, विक्रम ठाकरे यांना 9 केंद्रावर व देवेंद्र भुयार यांना मोर्शी शहरातील फक्त 3 मतदान केंद्रावर शंभरी गाठता आली.
मोर्शी शहरात 32 हजार 832 मतदार असून यापैकी 20 हजार 788 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.यापैकी भाजपचे चंदू यावलकर यांना 11 हजार 355 मते मिळाली.
संपूर्ण मतदार संघात झालेल्या निवडणुकीत आठ उमेदवारापेक्षा नोटा ( यापैकी कोणी नाही )ला जास्त मते मिळाली.
नोटा ला 749 मतदारांनी पसंती दिली.
उभ्या असलेल्या उमेदवारापैकी नऊ उमेदवाराना हजार मताचा सुद्धा आकडा गाठता आला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close