अजित दादांनी दिल्लीत केली मोठी घोषणा
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने 41 जागांवर विजय नोंदवला आहे.दिल्लीत त्यांची अमित शहा सोबत बैठक होणार आहे. या बैठकीला फडणवीस ,शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आज राजधानीत पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे।
दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले, डिसेंबरनंतर पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेणार असून पुढील जबाबदाऱ्या निश्चित करणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीसांना पाठींबा देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारले असता अजित पवार म्हणाले, आम्ही आधीच जाहीर केले होते की भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. मुख्यमंत्री त्यांचाच होईल. त्यांचे आमदार ज्या नेत्याला पाठींबा देतील. त्याला आमचा देखील पाठींबा असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्रिपदासाठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे यांनी देखील जाहीर केले आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.
दिल्लीची निवडणूक लढणार
फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे संकेत प्रफुल पटेल यांनी दिले. तर, कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.