क्राइम

मौलाना कडून 10 वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार

Spread the love
 

प्रतिनिधी  / नांदेड 

                   धार्मिक शिक्षण घेण्यासाठी आलेला 10 वर्षीय बालक मौलानाच्या अनैसर्गिक अत्याचाराला बळी पडला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. यानंतर मौलाना आणि मदरसा चालक दोन्ही फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहराजवळच्या वाघी रोड हस्सापुर येथे दार-ए – अरखांम नावाने मदरसा चालवला जातो. या मदरशात जवळपास ३० मुलं निवासी राहून धार्मिक शिक्षण घेतात. अन्य मौलानासह मूळचा बिहार येथील 26 वर्षीय महोमद शाहनवाज हा मौलाना देखील मुलांना शिक्षण देतो.

दोन दिवसांपूर्वी आरोपी मौलाना महोमद शाहनवाज याने एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. कुणाला सांगू नको, अशी धमकीही या मौलानाने पीडित मुलाला दिला. पण त्रास असह्य होत असल्याने पीडित मुलाने मदरश्याबाहेरील पानटपरी चालकाला हा प्रकार सांगितला. या मुलाकडून हकीकत ऐकून टपरीचालक हैराण झाला आणि मौलानाचं बिंग फुटलं.

ही संपूर्ण घटना पीडित मुलाच्या कुटुंबीयांनाही कळाली. पीडित मुलाच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरुन आरोपी मौलाना शाहनवाजसह मदरसा चालक मौलाना अय्युब खासमी विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मदरसा चालकाने आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्याला सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close