विदेश

विमानतळावर उभ्या असलेल्या विमानावर कोसळली वीज

Spread the love

ब्राझील / नवप्रहार ब्युरो

 पावसाळ्यात वीज कोसळण्याच्या अनेक घटना घडतात, ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परंतु, विमानावर वीज कोसळताना कधी तुम्ही पाहिली आहे काय ? सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात विमानतळावर उभा असलेल्या विमानावर अचनाक वीज कोसळते.

ही घटना ब्राझीलमधील साओ पाउलो ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. इथे एक भयानक वादळ आले आणि मुसळधार पाऊस पडला. यादरम्यान, विमानतळावर उभ्या असलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानावर वीज कोसळली. विमानावर वीज कोसळल्याची घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

विमानतळावर खळबळ

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमान विमानतळावर उभे आहे आणि मुसळधार पाऊस पडत आहे. त्यावेळी अचानक विमानाच्या मागील भागात वीज कोसळली. या घटनेत विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. विमानाची तपासणी करण्यात आली आणि उड्डाणासाठी हिरवा कंदील देण्यात आला. या घटनेमुळे विमानाने सुमारे ६ तास उशिराने उड्डाण घेतली. मात्र, या घटनेमुळे विमानतळावर खळबळ माजली.

 

 

 

 

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, सर्वजण सुरक्षित आहेत हे जाणून बरे वाटले. दुसऱ्याने लिहिले आहे की, अशा घटना खूप सामान्य आहेत. विमाने अशा वीजेचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेली असतात. तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, मी विमानातून प्रवास करताना विमानावर चार वेळा वीज कोसळली होती. आणखी युजरने म्हटले आहे की, हे खूप भनायक दृश्य आहेत.

साओ पाउलोमध्ये मुसळधार पाऊस

शुक्रवारी साओ पाउलोमध्ये मुसळधार पाऊस पडला. अवघ्या काही तासांतच एका महिन्याभराचा पाऊस पडला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. अनेक गाड्या वाहून गेल्या आणि हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. यावेळी विमानतळावर उभ्या असलेल्या विमानावर वीज पडल्याची घटना कैद झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close