अजब गजब

एक असं मंदिर ज्यात प्रसादाऐवजी चढवली जाते ही वस्तु

Spread the love

 मंदिरात जायचं म्हटलं की, लोक देवी-देवतांच्या मूर्तीसमोर फुलं, हार आणि प्रसाद ठेवतात. पण लडाखच्या सुंदर डोंगरांमध्ये एक असं फारच अनोखं ठिकाण आहे. जिथे लोक फुलं किंवा हार नाही तर प्लास्टिकची पाण्याची बॉटल वाहतात.

मनाली-लेह नॅशनल हायवेवर समुद्र सपाटीपासून साधारण १७ हजार फूट उंचीवर गाटा लूप्सच्या १९व्या वळणावर हे अनोखं मंदिर आहे. डोंगरदऱ्यातील वळणदार रस्त्यांवर असलेल्या या छोट्या मंदिराबाहेर पाण्याच्या बॉटल्स एक विशाल ढीग बघायला मिळतो.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ठिकाणी आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त प्लास्टिकच्या बॉटल्स जमा झाल्या आहेत. आधी तर हा एखादा कचऱ्याचा ढीग वाटतो, पण यामागे एक फारच अनोखी आणि भावनिक कहाणी आहे.

एका ट्रक हेल्परचा वेदनादायी अंत

या अनोख्या आणि अजब परंपरेची सुरूवात १९९८ च्या आसपास झाली होती. स्थानिक मान्यतांनुसार, त्यावेळी बर्फवृष्टी दरम्यान एक ट्रक या दुर्गम रस्त्यावर खराब झाला होता. गोठवणारी थंडी आणि बर्फाच्या वादळात ट्रकचा ड्रायव्हर ट्रकच्या सुरक्षेसाठी हेल्परला तिथेच ठेवून मदत मागण्यासाठी बाजूच्या गावाकडे पायी निघून गेला होता.

डोंगरातील अवघड रस्ते आणि बिघडलेल्या वातावरणामुळे ट्रक ड्रायव्हरला परत येण्यास पाच दिवसांचा वेळ लागला होता. जेव्हा ड्रायव्हर पाच दिवसांनी मदत घेऊन परतला, तेव्हा फार उशिर झाला होता. भूक आणि भीषण तहानेमुळे ट्रकच्या हेल्परचा वेदनादायी अंत झाला होता.

तहानलेलं ‘भूत’ आणि मंदिराचं निर्माण

असं सांगितलं जातं की, काही दिवसांनंतर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सना आणि प्रवाशांना अजब अनुभवांचा सामना करावा लागला होता. लोकांनी दावा केला होता की, रात्रीच्या अंधारात आणि शांततेत इथे एक सावली दिसते, जी गाड्या थांबवून पिण्याचं पाणी मागते. जे लोक पाणी देत नाहीत, त्यांच्यासोबत पुढे प्रवासादरम्यान काही ना काही दुर्घटना घडतात किंवा त्यांच्या वाहनात काही बिघाड होतो.

 

अशात रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्या भटकत्या आत्म्याच्या शांतीसाठी २००१ सालात स्थानिक लोकांना आणि ड्रायव्हर्सनी मिळून त्याच ठिकाणी एक छोटं मंदिर उभारलं. तेव्हापासून इथून ये-जा करणारे लोक सुरक्षित प्रवासाची मागणी करत मंदिरात पाण्याची बॉटल वाहतात.

प्लास्टिक प्रदूषणाचा मोठा धोका

श्रद्धा आणि सुरक्षेच्या भावनेतून झालेली ही पंरपरा आता लडाखच्या पर्यावरणासाठी एक गंभीर समस्या बनत चालली आहे. दरवर्षी पर्यटन सीझनमध्ये हजारोंच्या संख्येने इथे येणारे पर्यटक पाण्याची बॉटल आणि काही लोक सिगारेट-तंबाखू सुद्धा मंदिरात ठेवतात. डोंगरांमधून येणारा तूफान वाऱ्याने या बॉटल उडून दूरदूरपर्यंत डोंगरदऱ्यांमध्ये पसरल्या आहेत. ज्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे.

लडाख प्रशासन आणि काही पर्यावरण संरक्षक आता सोशल मिडियाच्या माध्यमातून पर्यटकांना अपील करत आहे की, अंधविश्वासाच्या किंवा श्रद्धेच्या नावावर तिथे प्लास्टिकच्या बॉटल ठेवण्यासाठी दगडांवर थोडं पाणी टाकून पुढे जावे. जेणेकरून लडाखचं नैसर्गिक सौंदर्य वाचवता यावं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close