सामाजिक

या कारणाने प्लॅटफॉर्म नंबर ६ जवळ माजली धावपळ 

Spread the love
कल्याण / विशेष प्रतिनिधी
                 कल्याण रेल्वे स्थानकात मध्यरात्रीच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्र. ६ वर अचानक धावपळ माजली. प्रवाशी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कारण प्लॅटफॉर्म क्र. ६ च्या रेल्वे रुळावर साडेपाच – सहा फुटाच्या अजगराने एन्ट्री केली होती.

रात्रीच्या वेळी रुळांवर हा अजगर सरपटत असल्याचे लक्षात येताच लोहमार्ग पोलिसांनी तत्परता दाखवत तात्काळ वॉर फाऊंडेशनच्या सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच वॉर फाऊंडेशनचे धाडसी सर्पमित्र तन्मय माने  आणि तेजस गायकवाड  यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे रूळांवरील वर्दळ, धावत्या लोकल गाड्यांचा धोका आणि विजेच्या तारांची धोकादायक परिस्थिती लक्षात घेता अत्यंत संयमाने आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत या अजगराची सुरक्षित सुटका करण्यात आली. सर्पमित्रांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला. रूळांवरून यशस्वीरीत्या पकडल्यानंतर या अजगराला पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी वन विभागाच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले असून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी साप किंवा इतर कोणतेही वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता, तसेच स्वतःहून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन प्रशासन आणि वॉर फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ लोहमार्ग पोलिस, वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा.

साप आणि अजगर हे निसर्गातील अन्नसाखळीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्यांची मोठी भूमिका असते. त्यामुळे अशा वन्यजीवांना कोणतीही इजा न पोहोचवता प्रशिक्षित व्यक्तींच्या मदतीने त्यांची सुटका करणे हेच खरे मानवतेचे लक्षण ठरते. कल्याण रेल्वे स्थानकात सर्पमित्रांनी दाखवलेली ही तत्परता आणि वन्यजीव संरक्षणासाठी केलेले कार्य सध्या सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close