अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या पथकाची दहीहंडा फाट्यावर कारवाई

75 हजार 500 रूपयाचा मुद्दे माल जप्त
गणेश बोरचाटे देवरी ता अकोट
अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील दहीहंडा फाटा येथे कारवाई केली. या कारवाईत अवैध देशी दारूसह मोटारसायकल व मोबाईल असा एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत ५५० नग देशी दारू (किंमत २७ हजार ५०० रुपये), मोटारसायकल (४० हजार रुपये) व मोबाईल (८ हजार रुपये) असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी दहीहंडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शाम बुंदेले पोहवा. बजरंग इंगळे, पोहवा. गिरीधर चव्हाण, पोहवा. अनिल सिरसाट, पो.कॉ. अक्षय ढेपे व पो.कॉ. राजेश राठोड यांचा सहभाग होता.
अकोट-अकोला मार्गावर दुचाकींवरून देशी दारूच्या पेट्यांची खुलेआम वाहतूक
अकोट-अकोला मार्गावर उगवा परिसरातून दुचाकी वाहनांच्या माध्यमातून देशी दारूच्या पेट्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अकोट फाईल पोलीस स्टेशनपासून दहीहांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीपर्यंत अवैध देशी दारू वाहतुकीचा प्रकार सुरू असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे. संबंधित दारू नेमकी कुठून आणली जात होती, तिच्यावर बॅच नंबर व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकृत चिन्ह आहे का, तसेच दारू बनावट आहे की अधिकृत, याचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
“योग्य तो तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.”
सीमा झावरे
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला
“नागरिकांनी अवैध दारू वाहतूक किंवा विक्रीबाबत योग्य माहिती द्यावी. मिळालेल्या माहितीच्या आधारे परिणामकारक कारवाई करण्यात येईल.”
प्रमोद कांबळे
निरीक्षक, भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला




