सामाजिक

निदा खान च्या अडचणीत वाढ,आता नवऱ्यानेही उचलले पाऊल 

Spread the love

नाशिक /विशेष प्रतिनिधी

आयटी कंपनीत धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणा मुळे चर्चेत आलेल्या निदा खान च्या अडचणी वाढल्या आहेत. आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या निदा खान हिला कोर्टाने जामीन मंजूर केला होता.दरम्यान ती अनेक दिवस फरारीत होती. आता तिच्या पतीने कोर्टात फारकतीसाठी अर्ज केला आहे. निदा खान हिचे कौटुंबिक कलह टोकाला गेल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

नाशिक सत्र न्यायालयाने निदा खान हिचा  सशर्त जामीन मंजूर केला होता. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा एजाज खान हिच्यावर कारवाई करण्यात आली होती. गर्भवती असतानाही जेलमध्ये राहण्याची वेळ आली. तिच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी तौसिफ बिलाल आत्तार यालाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संबंधित गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता.. नाशिकमधील या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती.

त्यातच आता या प्रकरणातील आरोपी असलेल्या निदा खान हिच्या आयुष्यात मोठे संकट आल्याचे बघायला मिळतंय. तिच्या अडचणीत मोठी वाढ झाली. न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करत असताना निदा खान हिच्यासमोर वैवाहिक आयुष्यात मोठे संकट आले. आठ महिन्यांची निदा गरोदर आहे. 2 ते 3 वर्षांपूर्वीच तिचे लग्न झाले होते. निदाचा काैटुंबिक कलह टोकाला गेला.

निदाच्या पतीने थेट कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. याच अर्जाची दखल घेत निदाला कोर्टाने समन्स बजावला आहे. 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयात तिला प्रत्यक्षात हजर होण्याचा आदेश दिला. बहुराष्ट्रीय कंपनीतील पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून निदा खान हिच्यासह अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने निदाचा जामीन मंजूर केला.

26 मार्चपासून या गंभीर गुन्ह्यामध्ये नाव आल्यापासून पोलिस तपास आणि न्यायालयीन चाैकशीच्या सावटामुळे निदाच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम झाला. बदनामी आणि ओढवलेली नामुष्की यामुळे निदाच्या नवऱ्याने थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कायदेशीर प्रक्रिया, गरोदर, सामाजिक दबाव यात निदाचा संसारची तुटताना दिसतोय. आता यावर कोर्ट काय निर्णय देते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close