क्राइम

मुलीचा वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध आणि वडिलांनी केले हे कृत्य 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

                    वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध करणाऱ्या मुलीचा वडीलांनी काटा काढला आहे.  अवघ्या २० वर्षांच्या पोटच्या मुलीची बापानेच गळा आवळून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे वडाळा परिसरात खळबळ माजली आहे.

दुसऱ्या लग्नाला विरोध अन् घरात एकटी असताना कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, रिफत शरीफ खान (वय २०) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर शरीफ रझा हुसेन खान (वय ४५) असं अटक करण्यात आलेल्या नराधम बापाचं नाव आहे. आरोपी शरीफ खान याला दुसरं लग्न करायचं होतं. मात्र, त्याची २० वर्षांची मुलगी रिफत हिचा या दुसऱ्या लग्नाला तीव्र विरोध होता.

मुलीच्या विरोधामुळे आरोपी बापाच्या मनात तिच्याविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता. घरात कोणीही नसताना संधी साधून आरोपीने रिफत हिचा गळा आवळून तिची हत्या केल्याचा संशय आहे.केईएम रुग्णालयात शवविच्छेदन; आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत मुलीच्या गळ्याभोवती गंभीर जखमा आणि खुणा आढळून आल्याने पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी शरीफ खान याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

तपासाअंती वडाळा पोलिसांनी आरोपी वडील शरीफ रझा हुसेन खान याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. मयत रिफत हिचा मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईतील केईएम (KEM) रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात हत्येचा अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close