क्राइम

घराबाहेर झोपलेल्या तरुणाचे सकाळी मुंडके आढळले शरीरावेगळे

Spread the love

विजयपुरा ( कर्नाटक ) / विशेष प्रतिनिधी

कर्नाटकाच्या विजयपुरा येथून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एक तरुण रात्री घराबाहेर खाटेवर झोपला होता. मात्र, सकाळी उठताच त्याचे मुंडके शरीरापासून वेगळे झाले होते. सकाळी उठून ग्रामस्थांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाव हादरून गेले होते.

गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मृत तरुणाची इसाक बागवान (वय 25) अशी ओळख समोर आली होती.

घराबाहेरील खाटेवर झोपलेल्या तरुणाचे डोके शरीरापासून झाले वेगळे

घटनेच्या प्राथमिक माहितीनुसार, इसाक बागवान हा घराबाहेरील खाटेवर गाढं झोपी गेला होता. रात्री काही हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात इसाकची हत्या करण्यात आली. हल्ला इतका भीषण होता की, तरुणीचे डोके हे शरीरापासून वेगळे झाले होते. सकाळी ग्रामस्थांनी तिचा मृतदेह पाहिला आणि या घटनेची गावात चर्चा झाली.

या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नंतर प्रकरण जाणून घेतले आणि तपास केला होता. नंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून प्रकरणाचा पुढील तपास केला असता, यामागील नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आणि आरोपींची ओळख समजून घेत त्यांची चौकशी केली.

या प्रकरणाचा लवकरच खुलासा करण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामस्थांचा दावा असाय की, या क्रूर कृत्याने परिसरात गावातच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तपास जसा पुढे जाईल तसा हत्येमागील खुलासा होईल, असा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close