राष्ट्रीय

माय आणि एक लेक पाकिस्तानी तर अन्य तीन भारतीय

Spread the love
कर्नाटक /विशेष प्रतिनिधी
              भारत सरकारला बुचकाळ्यात टाकणारे प्रकरण कर्नाटक च्या  चिक्काबल्लापूर येथून समोर आले आहे. येथे एक महिला आणि तिची एक लेक पाकिस्तानी तर अन्य तीन मुले भारतीय असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरण उघड होताच सरकारी यंत्रणा हलली असून तहसीलदारांनी महिला आणि तिच्या मुलांचे मतदार ओळखपत्र रद्द केले आहे.

कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण नागरिकत्वासंदर्भातील आहे. येथे राहणाऱ्या एका दांपत्याला एकूण चार मुले आहेत. मात्र त्यांतील एक मुलगा पाकिस्तानी नागरिक आहे. तर इतर तीन जण भारतीय नागरिक आहेत. एवढेच नाही तर, यामुलांची आई सुरुवातीपासूनच एक पाकिस्तानी नागरिक आहे आणि भारतात बेकायदेशीरपणे राहत आहे. आता या प्रकरणासंदर्भात पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित माय-लेकाला अटक केली आहे.

अधिक माहती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, या पाकिस्तानी महिलेने आणि तिच्या मुलाने भारतात बेकायदेशीरपणे रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्रसुद्धा मिळवले होते.
दोघांनाही अटक –
‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एक पाकिस्तानी महिला आणि तिचा एक मुलगा भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना चिक्काबल्लापूरचे पोलीस अधिकारी कुशल चौकसे यांनी सांगितले, “सूत्रांकडून माहिती मिळताच आम्ही कारवाई केली. फराह नाझ आणि तिचा मुलगा मोहम्मद फरदीन या पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आला आहे. त्यांनी बेकायदेशीरपणे मिळवलेले रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र देखील जप्त करण्यात आले आहेत. या दोघांवरही बीएनएस (BNS) आणि परदेशी नागरिक कायद्याशी संबंधित विविध कलमांतर्गत गन्हा दाखल संबंधित विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
नेमकं प्रकरण काय…?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सुरू झाले ते संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमधून. चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील बागेपल्ली येथील रहिवासी मोहम्मद अयुब खान नौकरीनिमित्त यूएईमध्ये गेला होता. तेथे त्याची मैत्री पाकिस्तानच्या फराह नाझशी झाली. या नंतर मैत्रचे रुपांतर लग्नात झाले. जेव्हा पहिल्या > अपत्याला जन्म देण्याची वेळ आली, तेव्हा फराह पाकिस्तानला निघून गेली. तेथे तिने पिहिल्या मुलाला जन्म दिला. यामुळे तिचा मोठा मुलगा पाकिस्तानी नागरिक बनला. यानंतर फराह पुन्हा सौदी अरेबियाला गेली आणि तेथून भारतात आली. भारतात आल्यानंतर तिने आणखी तीन मलांना जन्म दिला. आता या तीन मुलांचा जन्म भारतात झाल्याने ते भारतीय नागरिक बनले.
हे प्रकरण समोर आल्यानंतर, चिक्काबल्लापूरच्या तहसीलदारांनी या माय-लेकांचे मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड रद्द केले आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close