हटके

जेलर पडली कैद्याच्या प्रेमात ,कुटुंबीयांचा विरोध झुगारून केले लग्न 

Spread the love

सतना ( मध्यप्रदेश ) / विशेष प्रतिनिधी

म्हणतात न की प्रेमाला कुठलीही मर्यादा नसते आणि प्रेमाला कोणतेही बंधन बांधू शकत नाही. प्रेम हे कोणाशीही आणि कधीही होऊ शकते. अगदी साता समुद्रापार व्यक्तीशी देखील . याचीच प्रचिती याप्रकरणात आलीं आहे.

मध्य प्रदेशातील सतना जेलमध्ये कार्यरत असलेली एक महिला जेलर शिक्षा भोगलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडल्याची अनोखी घटना समोर आली आहे. हे प्रेम इतकं होतं की, आपल्या जोडीदारासाठी जेलर फिरोजा खातूनने सर्व सामाजिक बंधनं तोडून टाकली.

कुटुंबीयांच्या विरोधानंतरही तिने धर्मेंद्र सिंह याच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. विशेष म्हणजे या लग्नात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिरोजा खातूनचं कन्यादान केलं.

सतना मध्यवर्ती कारागृहात सहाय्यक जेल अधीक्षक पदावर कार्यरत असलेली फिरोजा खातूनची भेट ड्युटी दरम्यान धर्मेंद्रशी झाली होती. जेलमध्ये फिरोजा या ‘वॉरंट इंचार्ज’ होत्या, तर शिक्षा भोगत असलेला धर्मेंद्र वॉरंटशी संबंधित कामात मदत करायचा. तिथेच दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. धर्म आणि समाजाची पर्वा न करता दोघांनी हिंदू रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला.

धर्मामुळे कुटुंबाचा होता विरोध

धर्मेंद्र सिंह छतरपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. २००७ मध्ये एका हत्येच्या प्रकरणात तो जेलमध्ये गेला होता. चार वर्षांपूर्वी शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांची सुटका झाली, मात्र तरीही फिरोजा खातूनसोबतचे त्याचे प्रेमसंबंध कायम होते. फिरोजाचं कुटुंबीय या लग्नासाठी तयार नव्हतं, कारण धर्मेंद्र हिंदू आणि फिरोजा मुस्लिम होती. त्यामुळे हा प्रवास सोपा नव्हता.

धर्मेंद्र सिंह छतरपुर जिल्ह्यातील चंदला गावचा रहिवासी आहे. २००७ मध्ये चंदला नगर परिषदेचे कृष्णादत्त दीक्षित यांची हत्या झाली होती. याच हत्येच्या प्रकरणात धर्मेंद्रला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सतना मध्यवर्ती कारागृहात असताना जेलर फिरोजावर प्रेम जडलं. आता दोघांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लग्न केलं आहे.

कुटुंबाचा विरोध झुगारून लग्न

फिरोजा यांनी कुटुंबाचा विरोध झुगारून ५ मे रोजी छतरपुर जिल्ह्यातील लवकुशनगर येथे धर्मेंद्रशी लग्न केलं. लग्नाचे सर्व विधी हिंदू परंपरेनुसार झाले. हिंदू धर्मात कन्यादान केलं जातं. फिरोजाचं कुटुंब लग्नाला उपस्थित नसल्यामुळे सतना येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राजबहादूर मिश्रा यांनी आपल्या पत्नीसह कन्यादान केलं. यावेळी बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित हंदाहन

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close