विशेष

१ मे रोजी मिसिंग लिंक प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण 

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी

बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत.त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पणासाठी १ मेची तारीख निश्चित करून त्यासाठी वेळ दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) लोकार्पणाच्या तयारीला वेग दिला आहे. खोपोली येथील बोगद्यात १ मे रोजी लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार असून त्यानंतर ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे ही प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बाब ठरणार आहे.

युद्धाचा फटका, पण वेळेत काम पूर्ण

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान १३.३ किमी लांबीची नवीन मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला. ही मार्गिका म्हणजेच मिसिंग लिंक. या मिसिंग लिंकच्या कामाला २०१९ मध्ये दोन टप्प्यांत सुरुवात करण्यात आली. हे काम २०२१ मध्ये पूर्ण होऊन ही मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे या मार्गिकेला विलंब झाला असून अजूनही ही मार्गिका सेवेत दाखल झालेली नव्हती. पण एमएसआरडीसीने एप्रिल २०२६ अखेर प्रकल्पाचे काम पूर्ण करून १ मे २०२६ रोजी मिसिंग लिंक सेवेत दाखल करण्याचे जाहीर केले.

त्यानुसार पाच-सहा महिन्यांपासून कामाला वेग दिला. मार्चअखेरीस ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले. मात्र अमेरिका, इस्त्रायल – इराण युद्धाचा फटका या प्रकल्पालाही बसला. प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी डांबरच उपलब्ध होत नसल्याने एमएसआरडीसीच्या अडचणी वाढल्या. परिणामी, १ मेचा मुहूर्त चुकणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. यासंबंधीचे वृत्तही प्रसिद्ध झाले. मात्र कोणत्याही परिस्थितीत १ मेचा मुहूर्त गाठायचे उद्दिष्ट आमच्यासमोर होते. त्यानुसार मोठ्या प्रयत्नांनी डांबर उपलब्ध करून आता १०० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. तर वजनासंबंधीच्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे लोकार्पणासाठी वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी १ मेची वेळ दिली आहे. तेव्हा १ मे रोजी मिसिंग लिंकचे लोकार्पण होणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

मिसिंग लिंकच्या लोकार्पणाचा मुहूर्त निश्चित झाला असून लोकार्पणाच्या सोहळ्याची जय्यत तयारी एमएसआरडीसीकडून सुरू आहे. खोपोली येथील बोगद्यात लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. लोकार्पणानंतर काही तासांनी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे अतिजलद प्रवासाची प्रवाशांची, वाहनचालकांची प्रतीक्षा १ मेला संपुष्टात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील घाटातील प्रवास टाळून ३० मिनिटांची प्रवासाच्या वेळेची बचत करून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे मुंबई – पुणे प्रवास दीड ते पावणे दोन तासांत करणे शक्य होणार आहे.

 

 

 

 

 

 

 

अतिजलद आणि सुरक्षित प्रवास

 

 

 

महामार्गावरील प्रवास ६ किमीने कमी होणार आहे. त्यामुळे ३० मिनिटांची बचत होणार असून प्रवास अतिजलद होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गिकेवर स्फोटके, ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. वायू गळती, स्फोटके आदींमुळे होणारा स्फोट, अशा प्रकारच्या दुर्घटनांची भीती येथे नसणार आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या टँकर अपघातानंतर महामार्गावरील वाहनांच्या, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण मिसिंग लिंकवरील प्रवास अतिजलद प्रवासाबरोबर सुरक्षित असणार असल्याचा दावा एमएसआरडीसीकडून करण्यात आला आहे.

 

दुर्घटनांची भीती येथे नसणार आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर झालेल्या टँकर अपघातानंतर महामार्गावरील वाहनांच्या, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण मिसिंग लिंकवरील प्रवास अतिजलद प्रवासाबरोबर सुरक्षित असणार असल्याचा दावा एमएसआरडीसीकडून करण्यात आला आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close