क्राइम

तो तरुणी आणि महिलांना फॉर्म हाऊस वर नेऊन करायचा निर्वस्त्र 

Spread the love

 

  • मुंबई / विशेष प्रतिनिधी 
             राज्यात एका मागून एक घडत असलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर राज्यात नेमकं चाललंय तरी काय ? असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. लिंगपिसाट अशोक खरात ,ऋषिकेश वैध, नाशिक मधूनच १२१ महिलांचे शोषण करणारा नराधम अशी मालिका सुरू असतानाच आता नवी मुंबईतून आणखी एक संतापजनक बातमी समोर आली आहे. येथील एका भोंदू बाबाने आर्थिक , शारीरिक आणि सामाजिक समस्या दूर करण्याचे आश्वासन देत महिलांना खालापूर येथे निर्जनस्थळी बांधलेल्या फॉर्म हाऊस वर नेऊन तो महिलांना निर्वस्त्र करायचा. या घटनेमुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे. 
काळीजादू, भानामती दूर करण्याच्या नावाखाली नवी मुंबईतील अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा भोंदूबाबा अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत होता. कधी गोड बोलून त्यांना वश करायचा तर कधी काळी जादूची भीती दाखवून तो महिलांसोबत विकृत कृत्य करायचा. धक्कादायक म्हणजे  खालापूर येथील निर्जनस्थळी बांधलेल्या फार्म हाऊसवर महिलांना तो अघोरी पूजा करण्यासाठी बोलवायचा. सांताक्रूझमधील मायलेकीने या बाबाविरोधात तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
भोंदू बाबाजान महिलांना सांगायचा की, तुमच्यावर काळी जादू झाली आहे, ती काढण्यासाठी तुम्हाला एकट्याने यावं लागले. त्यानंतर मग तो खालापूर इथे एका निर्जनस्थळी बांधलेल्या फार्महाऊसवर महिलांना घेऊन जात होता. त्यानंतर मध्यरात्री काळ्या जादूच्या बहाण्याने तो महिलांच्या अंगावरील वस्त्रे काढायचा आणि अघोरी पूजेला त्यांना बसवायचा. काही महिला विवस्त्र होण्यास नकार द्यायचा. तेव्हा तो विरोध केल्यास जादूटोणा आणि जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा, असं पीडित महिलांनी पोलिसांनी सांगितलं.
तो त्यांना आर्थिक, सामाजिक, शारीरिक, वैवाहिक समस्या दूर करण्याचे आमिषही दाखवायचा. त्यातूनच त्याने एका विवाहितेवर अत्याचार केला. एवढंच नाही तर सांताक्रूझ इथल्या आई आणि तिच्या मुलीवर बलात्कार करून त्या दोघींनाही जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून भोंदू बाबाजान बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान मुस्लिम सत्यशोधक मंडळाने बाबाजानने अत्याचार केलेल्या महिलांना पाठिंबा देत पोलीस ठाण्यात  तक्रार करण्यास प्रोत्साहित केलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close