क्राइम

स्वतःला अत्याचारापासून वाचविण्यासाठी तिने ती HIV  पॉजीटीव्ह असल्याचे सांगितले

Spread the love
 
तरी देखील त्याला दया आली नाही, बलात्कार करून गुप्तांगात सळई खुपसली 
 

हैदराबाद  / विशेष प्रतिनिधी 

                  महिलांचे जीवन फारच धोक्याचे आहे असे मागील काही काळात महिलांवर होत असलेल्या अत्याचारातून समोर येत आहे. महिला/ तरुणी नोकरीच्या ठिकाणी तर सोडा सार्वजनिक ठिकाणी आणि आपल्या घरी देखील सुरक्षित नसल्याचे त्यांच्यावर घरातच स्वकीयांकडून घडणाऱ्या अत्याचारावरून उघड होत आहे.
              स्वतःच्या घरात असलेल्या महिलेला पाणी मागत जबरदस्तीने तिच्या घरात घुसून तिचे  ओढणीने हातपाय बांधून आणि तिच्या तोंडांत कापडी बोळा कोंबून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. स्वतःला नराधमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी तिने ती HIV संक्रमित असल्याचे सांगितले. तरी देखील त्या वासनांध आरोपीने तिच्यावर बलात्कार केलाच. शिवाय तिच्या गुप्तांगात सळई (लोखंडी रॉड) टाकून आपल्या क्रूरत्तेचा परिचय दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला सुरुवातीला नरसारावपेट येथील विभागीय रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र अधिक चांगल्या उपचारांसाठी तिला गुंटूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. “तिची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तिला येथे आणण्यात आले आहे” असे गुंटूर येथील रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. श्रीनिवास प्रसाद यांनी सांगितले.

पतीपासून विभक्त महिला

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, शासकीय विभागात ‘अटेंडंट’ म्हणून कार्यरत असलेली ही तरुणी आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. गेल्या वर्षीच ती सात्तेनपल्ली शहरातून येथे राहायला आली होती. तिचा भाचा तिच्यासोबतच राहतो; परंतु दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तो सात्तेनपल्लीला गेला होता.

तोंडात बोळा कोंबून अत्याचार

पीडित तरुणी घरी एकटीच असताना, हल्लेखोराने तिचा दरवाजा ठोठावला आणि पिण्यासाठी पाणी मागितले; त्यानंतर त्याने शस्त्राच्या धाकाने तिच्यावर बळजबरी केली, असे पोलीस निरीक्षक व्यंकट रमणा यांनी सांगितले. आरोपीने त्या महिलेला एका ओढणीने बांधले, कापडाचा बोळा कोंबून तिचे तोंड गच्च बंद केले, तिच्यावर अत्याचार केला आणि तिला बेदम मारहाण केली.

एचआयव्ही झाल्याचं खोटं सांगितलं

स्वतःचा बचाव करण्यासाठी, आपण एचआयव्हीसारख्या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असल्याचे त्या महिलेने आरोपीला सांगितल्याचे समजते. मात्र आरोपीने आपला हल्ला सुरूच ठेवला आणि पळून जाण्यापूर्वी त्याने त्या महिलेच्या गुप्तांगात एक लोखंडी सळई खुपसली, असे पोलिसांनी सांगितले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close