अपघात

समृद्धी महामार्गावर मृत्यू तांडव ; भरधाव ट्रक ची  मजुरांच्या वाहनाला धडक

Spread the love

आठ महिलांचा मृत्यू ,पाच गंभीर जखमी 

 जालना / विशेष प्रतिनिधी 

                     मजूर घेऊन जाणाऱ्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला मागून येणाऱ्या भरधाव ट्रक ने धडक दिल्याने वाहनातील आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर पाच महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचा सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व महिला समृद्धी महामार्गावरील मजूर होत्या आणि त्या वाहनातून प्रवास करत होत्या. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मजुरांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले, आणि जखमींना प्रथम जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि नंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

निष्काळजीपणामुळे अपघात, चालक ताब्यात

प्राथमिक तपासात ट्रक चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.

या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोक पसरला असून स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अपघातामुळे रस्ते सुरक्षा आणि अतिवेगाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी शासकीय मदतीचे आश्वासन दिले.

प्रशासनाकडून पाहणी, तपास सुरू

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनीही घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, प्रशासनाने तपास अधिक तीव्र केला आहे.

पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या या अपघातात सात जणांचा बळी गेला असून, संपूर्ण जालना जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडण

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close