क्राइम

मोपेड ने जाणाऱ्या तरुण तरुणीला अडवून लुटमार करत तरुणीवर अत्याचार 

Spread the love
 
अमरावती / विशेष प्रतिनिधी 
 
          मोपेड ने  जात असलेल्या तरुण तरुणींना अडवून त्यांना मारहाण करत त्यांच्या कडील रक्कम हिसकावून घेत तरुणीवर बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार भानखेडा कडे जाणाऱ्या जंगलात घडला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरवात करत पाच आरोपींना अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा मित्र अँक्टिव्हा वाहनाने जात असताना अज्ञात पाच इसमांनी त्यांना अडवले. आरोपींनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर एका आरोपीने तरुणीला बाजूला नेत तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. सध्या पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 या प्रकरणी घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करत या गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपींना ताब्यात घेतलेय. या प्रकरणाचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करीत असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने पीडिता, साक्षीदार तसेच आरोपींबाबतची माहिती पोलिसांकडून अधिकृतरीत्या जाहीर होईपर्यंत प्रसारित करू नये, अन्यथा संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
 काही वर्षांपूर्वी पोहऱ्याच्या जंगलात प्रेमी युगलांना लुटून तरुणीवर अत्याचार करणारी टोळी होती सक्रियपोहरा परिसर जंगल परिसर असल्याने आणि येथे एकांत मिळत असल्याने अमरावती चे प्रेमी युगल येथे कृष्ण लीला साठी येत असतात.  गावातील काही डांबरट मुले अशा जोडप्यांवर लक्ष ठेवून असतात. ते जंगलात गेल्यावर आणि प्रेमी युगल आपल्या कार्यात लीन असताना हे टवाळखोर पोरं तिथे पोहचून तरुणाला मारहाण करून त्याच्या कडील रक्कम हिसकावून घेत सोबतच्या मुलीला आपल्या वासनेचे बळी बनवत होते.
 
              लाजेखातर आणि बदनामी पोटी तरुणी या अत्याचाराची कुठेही वाच्यता करत नसल्याने असला प्रकार दबून राहत होता. पण एका जोडप्याच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड.झाला होता. तरुणीवर अत्याचार झाल्या नंतर असले प्रकार उघड होतात. अनेक पालक आपल्या मुला मुलींना शिकण्यासाठी अमरावती पाठवतात. आणि मुले मुली असले प्रकार करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुला मुलींवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे काही सुजान नागरिकांचे मत आहे. 
 
 
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close