सामाजिक

ग्रामपंचायतच्या माध्यमातून गरजवंतांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देऊ -ग्रा. पं. सदस्य बाबासाहेब धिवर

Spread the love
अहील्यानगर– नगर तालुक्यातील कौडगाव जांब गावातील दलित वस्ती येथील अनेक वर्षापासून घरकुलापासून वंचित असणार्‍या गरजवंतांना त्यांच्या घरी वस्तीवर जाऊन विनामूल्य रमाई आवास योजनेचे फॉर्म देऊन शासनाच्या अटींमध्ये जे कागदपत्र असतात त्याची माहिती देऊन योग्य मार्गदर्शन करुन. जे लाभार्थी कागदपत्राची पूर्तता करून देतील. त्या गरजवंत एकल महिला, दिव्यंग यांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यास प्रयत्नशील राहणार आहे. तरी वंचित असणार्‍या नागरिकांनी लवकरात लवकर योग्य कागदपत्राची पूर्तता करून द्यावी असे आवाहन कौडगाव जांब ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर यांनी केले.
कौडगाव परिसरातील नागरीकांमध्ये रमाई आवास योजनेबाबत ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब धिवर यांनी जनजागृती करुन त्यांना या योजनेचे अर्ज देवुन योग्य ती माहिती दिली. तसेच गावातील वाड्या-वस्तींमध्ये जावून या अर्जांचे वाटप त्यांनी केले.
कौडगाव व परिसरातील अनेक लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेची माहिती देण्याचे काम ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब धिवर करत असतात. तसेच त्यांनी संजेय गांधी, श्रावण बाळ निराधार अनुदान योजना नगर तालुका  समितीच्या  माध्यमातून अनेक  गरजूवंत लाभार्थ्याला लाभ मिळवून दिला आहे.

कौडगाव परिसरातील नागरीकांमध्ये रमाई आवास योजनेबाबत ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब धिवर यांनी जनजागृती करुन त्यांना या योजनेचे अर्ज देवुन योग्य ती माहिती दिली. तसेच गावातील वाड्या-वस्तींमध्ये जावून या अर्जांचे वाटप त्यांनी केले. 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close