शेतात पत्नीला जिवंत जाळलं हे आहे त्यामागील कारण

बरेली (युपी) / नवप्रहार मीडिया
पती ने पत्नीला पर पुरूषा सोबत नको त्या अवस्थेत पाहिले आणि त्याला ईतका राग आला की त्याने पत्नीला शेतात जिवंत जाळलं. नेपाळ सिंग असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील बरेली इथं घडली आहे. अनैतिक संबंधामुळे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली. नेपाल सिंह असं आरोपीचं नाव आहे. पोलियांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
नेपाळ सिंगची पत्नीचे गावातील एक तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले होते. एकेदिवशी दोघेही शेतामध्ये गेले होते. याची माहिती आरोपी नेपाल सिंगला कळाली. त्याने शेतात जाऊन पाहिले असता ते नको त्या अवस्थेत आढळले. त्यामुळे त्याला कमालीचा राग आला. रागाच्या भरात त्याने बायकोला मारायला सुरुवात केली. त्यानंतर शेताला आग लावून दिली. पण त्याच क्षणी तिचा प्रियकर हा घटनास्थळावरून पसार झाला. पण आरोपीची महिला ही आगीच्या भक्षस्थानी सापडली. सकाळी तिचा कोळसाच पाहण्यास मिळाला होता.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी पाचरण करून आरोपी सिंगला अटक केली. मृत महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या महिलेचं वय 35 वर्ष असल्याचं सांगण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला 3 मुलं आहे. घटनेच्या आदल्या रात्री पत्नीने घरात सगळ्यांना जेवू घातलं. त्यानंतर सगळे झोपी गेले. अचानक रात्री पतीला जाग आली असता पत्नी जागेवर नव्हती. तिला शोधत गावात गेला असता शेतात गेल्याचं कळालं. त्यानंतर त्याने तिथे जाऊन पाहिलं तर बायको नको त्या अवस्थेत आढळली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने शेताला आग लावून टाकली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे.