मनसा माता यात्रा महोत्सव व महाप्रसाद.
मनातील मानस पूर्ण करणारी असल्याने
मातेवर भाविकांची असीम श्रद्धा*
हिवरखेड :- बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड येथून जवळच असलेल्या तळेगाव येथील मनसा माता मंदिरात 17 ऑक्टोबर गुरुवार रोजी भव्य महाप्रसाद व यात्रा महोत्सव होणार आहे.
मनसा माता या मंदिराची ओळख “भाविकांच्या मनातील मानस पूर्ण करनारी मनसा माता” अशी निर्माण झालेली आहे. भाविकांची मनसा मातेवर नितांत श्रद्धा असून नेहमी दर्शनासाठी श्रद्धाळूची आवर्जून उपस्थिती असते. येथील दर्शनाचे विशेष महत्व असल्याने दुरदुरुन भाविक दर्शनासाठी व आपल्या मनातील मानस पूर्ण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात.
हे देवीचे पवित्र मंदिर असून येथे कोणत्याही प्रकारचा बळी देण्यास व मुक्या जनावरांचे जीव देण्यासारख्या कुप्रथेला कोणतेही स्थान नाही.
तळेगाव येथील सोमेश्वर महादेव मंदिर सुद्धा सर्वदूर सुप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्रसोबतच सर्वांचे आराध्य दैवत आहे. येथे सोमेश्वर महादेवाची पश्चिम वाहिनी पिंड असून काशी विश्वेश्वर नंतर फक्त तळेगाव इथेच पश्चिम वाहिनी महादेवाची पिंड असल्याचेही जेष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील दुसऱ्या टोकावर मनसा माता विराजमान आहे शिव आणि शक्ती या दोघांच्या सान्निध्यात आणि छत्रछायेखाली तळेगाव आणि संपूर्ण परिसर वसला असल्याने येथील नागरिक आपल्याला वरदान प्राप्त मानत असून येथे कोणतीही प्राकृतिक आपदा येत नसल्याचा इतिहास वयोवृद्ध नागरिक सांगतात.
मनसा मातेच्या मंदिरात पुजारी सुभाष बंड हे अविरत सेवा देत असून संस्थापक अध्यक्ष प्रभूदास चोपडे, अध्यक्ष श्री मुन्नासेठ अग्रवाल (अकोट) हे समर्थ पणे धुरा सांभाळत असून मनसा मातेच्या भक्तांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांच्या सामूहिक सहकार्याने सातत्याने विकासकामे करीत आहेत.
मनसा माता संस्थान क दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र आहे.
तळेगाव हे गाव हिवरखेड तेल्हारा रोडवरील गोर्धा येथून पूर्वेस 3 किलोमीटर आहे.
17 ऑक्टोबर गुरुवार रोजी तळेगाव खुर्द येथे मनसा माता मंदिरात भव्य महाप्रसाद व यात्रा महोत्सव होणार आहे. सर्व भाविकांनी यात्रा महोत्सवात हजेरी लावून दर्शन, पूजन , आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मनसा माता विश्वस्तांनी आणि गावकऱ्यांनी केले आहे.