आदिवासी कोळी महादेव जमातीची एल्गार सभा ,
शिवसेनेचे ठाकरे गटांचे उपनेते शरददादा कोळी यांची तोफ कडाडणार
प्रतिनिधी/चोहोट्टा बाजार
चोहोट्टा बाजार:अन्यायग्रस्त आदिवासी कोळी महादेव जमातीला दहा वर्षं भुलथापा देणार्या सरकार तसेच मागाल साठ वर्षांपासून अन्याय करत असलेल्या राजकीय पक्षाना आपल्या वर होत असलेल्या अन्यायाची आठवन करुन देत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी कोळी महादेव जमात एकवटत असुन कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली न येता समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आदिवासी कोळी महादेव जमात आज चोहोट्टा बाजार ता.अकोट येथे एकवटून पच्छिम विदर्भात सात ते आठ विधानसभा मतदारसंघात आपली शक्ती दाखवनार आहे. धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आदिवासी कोळी महादेव जमातिचा बुलंद आवाज असून अकोला अमरावती बुलढाणा वाशीम जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातीच्या लोकांना संबोधित करनार आहेत. शरद कोळी हे सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव जमातिचे युवा नेते असुन राजकीय जिवनात येण्याआधी धाडस संघटनेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरुद्ध कायम आवाज ऊठवत असत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आदिवासी कोळी महादेव जमातीला न्याय मिळवून द्यायचा असेल तर राजकीय पर्याय असला पाहिजे हा ध्यास घेत शिवसेना ऊबाठा गटात हजारो समर्थकासह प्रवेश घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेना उपनेते म्हणून नियुक्ती केली होती..
आपल्या वर होत असलेल्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी सामाजिक एकता साधने महत्वाचे असल्याने आदिवासी कोळी महादेव जमातीच्या युवकांनी सर्व पक्षिय नेत्यांना कुठलाही राजकीय संबध नसलेला एखादा मेळावा घेऊन जमातीची ताकद दाखवून देण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाच्या बॅनर खाली मेळावा न घेता धाडस सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शरद कोळी यांना या मेळाव्याला उपस्थित राहत… जमातीला मार्गदर्शन करन्याची विनंती केली आनी शरद कोळी यांनी त्या विनंती ला मान देत जमातीसाठी सोलापूर येथे ऊपोषन सुरू असतांनाही त्या सहकार्याचे उपोषण सुरु ठेवत रविवारी दि ६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार चोहोट्टा बाजार येथे आदिवासी कोळी महादेव जमातीला संबोधित करुन आदिवासी कोळी महादेव जमातिचा आवाज माता रुख्मिणी च्या विदर्भा पासुन पंढरपूर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव जमात एकवटली असुन हा लढा फक्त निवडणूक पुरता मर्यादित न राहता या पुढे ऊग्र रुप धारण करून आदिवासी कोळी महादेव जमातीचा संघर्ष पेटवत वाल्मिकी चा वाल्या होण्याच्या मार्गावर असल्याचे आज होत असलेल्या मेळाव्यात आदिवासी कोळी महादेव जमातीचा प्रभाव दिसणार आहे …..