सामाजिक

भारतीय विद्यार्थी मोर्चा व संगटित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हा स्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Spread the love

भंडारा / हंसराज

भारतीय विद्यार्थी मोर्चा (BVM) आणि इतर सहयोगी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा जिल्हा स्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवा, बेरोजगार आणि विभिन्न समूहातील व्यक्तींना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, आणि राजकीय समस्यांबाबत जागरुकता आणि प्रशिक्षण देण्यात आले.

शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करून त्यांना दक्षता आणि प्रशिक्षण प्रदान करणे हा होता. भारतात 550 जिल्ह्यांमधील असे अनेक शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. सीबिरात BVM, BYF, BBM, RACS, BVCS, IRSA और बामसेफ या संघटनेच्या सहयोग घेतला.

प्रशिक्षक म्हणून मा. परवेज शेख, भारतीय युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी, यांनी नेतृत्व केले. या माध्यमातून विविध क्षेत्रातील विद्यार्थी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, पोलीस, शिक्षक, तसेच शेतकरी कष्टकरी व महिलांनी शेकडो च्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाची यशस्वी आयोजन करण्यासाठी भोजराज गभने, पूर्ण कालीन प्रचारक, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, ओबीसी मोर्चा, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेश महासचिव मोनू तुरकने, विदर्भ महासचिव सौरभ मेश्राम, आणि इंडियन रिसर्च स्कॉलर असोसिएशनचे अभय डी रंगारी यांचे योगदान मोलाचे होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close