मुलीच नाही तर मुलं सुध्दा असुरक्षित ; 10 वर्षाच्या मुलावर बलात्कार

पाकिस्तान / नवप्रहार इंटरनॅशनल डेस्क
महिलांवर आणि तरुणींवर अत्याचार हा काही नवीन प्रकार नाही. तसेच काही विकृत लोकं लहान मुलींवर देखील अत्याचार करतात. पण मागील काही काळापासून लहान मुलांवर सुध्दा अत्याचाराच्या घटनेत वाढ होतांना दिसत आहे. घटना शेजारी देश पाकिस्तान येथून येत आहे. येथे 10 वर्षाच्या मुलावर बलात्कार करण्यात आला आहे. पाकिस्तानमधील मुझफ्फरगडमध्ये एका 10 वर्षांच्या मुलावर बलात्कार करून त्याला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संशयिताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित केले, असे एका वृत्ताने समोर आले आहे.
ही घृणास्पद घटना जतोई तहसीलच्या बेट मिरहजार खान परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पोलीस कारवाई करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या गुन्ह्यामुळे मुलांची सुरक्षा आणि डिजिटल शोषणाबाबत मोठी चिंता निर्माण झाली.बेट मिरहजार खान पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने आंघोळीच्या खोट्या बहाण्याने तरुण मुलाला ट्यूबवेलमध्ये नेले.
वृत्तानुसार, नंतर या रेकॉर्डेड टेपचा वापर मुलाला ब्लॅकमेल करण्यासाठी केला गेला.पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानमध्ये , हे प्रकरण मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणावर प्रकाश टाकते.
स्वाबी-हरिपूर जिल्ह्याच्या सीमेजवळील आणखी एका घटनेत, पोलिसांनी एका तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. ही महिला हरिपूर जिल्ह्यातील संशयितांची नातेवाईक असल्याचे समजते. बाचा खान टीचिंग हॉस्पिटल, शाहमनसूर येथे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि या अतिप्रसंगाची पुष्टी झाली,अशी माहिती वृत्तामधून समोर आली.
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या पीडितेच्या जबाबाच्या आधारे आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे उटला पोलिस स्टेशनचे एसएचओ जिहाद खान यांनी सांगितले. सध्या संशयितांवर (इतिखार खान आणि सरताज खान) कायदेशीर कारवाई सुरू आहे.
अश्या घाणेरड्या वृत्तीचे लोक आपल्या आसपास असू शकतात. जे तुमच्या लहान मुलांवर नजर ठेऊन असतील. अश्या लोकांपासून तुमच्या लहान मुलांना सावध करण्यासाठी त्यांना गुड टच आणि बॅड टचची जाणीव करून देणे गरजेचे आहे. ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे.




