हटके

रिल्स बनवविणाऱ्या 5 मुलांच्या आईला फॉलोवर सोबत झाले प्रेम : घरून पळाली

Spread the love

जैसलमेर / नवप्रहार डेस्क

                       प्रेमाला वय जात – पात देश- परदेश याच्या काही सीमा नसतात. प्रेम हे कुठल्याही वयात आणि कोणासोबतही होऊ शकते. रिल्स बनवणाऱ्या एका 5 मुलांच्या आईला युवकासोबत प्रेम झाल्याने ती काहीतरी कारण सांगून घराबाहेर पडली. नंतर परतलीच नाही. पतीने पोलिसात तक्रार दिल्यावर प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला. पण ती प्रियकराला सोडून परत यायला तयार नव्हती.

महिलेचे एक युवकासोबत ऑनलाइन प्रेमसंबंध जुळले. ती युवकाच्या प्रेमात इतकी बुडाली की, तिने आपली 5 मुलं आणि नवऱ्याला सोडून दिलं. गुजरातला जाऊन ती प्रियकरासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. हे प्रकरण पोलीसात गेलं, तेव्हा महिलेने प्रियकरासोबतच रहायच आहे, असं सांगितलं. ती नवऱ्याला कंटाळली होती.

एका दूरच्या खेडेगावात राहणारी ही 32 वर्षांची महिला इन्स्टाग्रामवर रील बनवायची. हळू हळू तिची रील पाहून हजारो फॉलोअर्स तयार झाले. इन्स्टाग्रामवर एका युवकासोबत महिलेची मैत्री झाली. त्याच्या प्रेमात ती पडली. महिलेच्या पदरात पाच मुलं आहेत. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या युवकाच्या प्रेमात महिला पार बुडून गेली होती. तिने नवरा आणि मुलांना सोडलं.

प्रेमाची सुरुवात कशी झाली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या कीता गावात राहणाऱ्या नेमी देवीच लग्न 15 वर्षापूर्वी झिनझिनियालीच्या नारणा राम भील सोबत झालं होतं. नेमी देवी कधी शाळेत गेली नाही. ती 32 वर्षांची आहे. इन्स्टाग्रामवर ती डान्सचे रील पोस्ट करायची. तिचे 40 हजार फॉलोअर्स तयार झाले. इन्स्टाग्रामवर तिची ओळख लोक गायक भीमाराम बरोबर झाली. संपर्कात आल्यानंतर दोघे बोलू लागले. हळूहळू दोघे परस्परात गुंतत गेले. दोघांमध्ये अफेअर सुरु झालं.

प्रियकरासोबत हजर झाली

दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. नेमी देवी काहीतरी कारण सांगून घरातून बाहेर पडली व प्रियकरासोबत राहू लागली. अचानक पत्नी गायब झाल्याने तिच्या नवऱ्याने जैसलमेर सदर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी नेमी देवीचा शोध सुरु केला. सोमवारी बाडमेर जिल्हा मुख्यालयात नेमी देवी प्रियकरासोबत हजर झाली. महिला पोलीस ठाण्याने जैसलमेरच्या सदर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

पोलिसांनी या प्रकरणात काय केलं?

नेमी देवीने सांगितलं की, “तिला 5 मुलं आहेत. नवरा तिला मारहाण करायचा. तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे ती कंटाळलेली” या दरम्यान इन्स्टाग्रामवर तिची ओळख लोक गायक भीमराम बरोबर झाली. दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आता तिला लग्न करुन प्रियकरासोबत रहायचय. पोलिसांनी दोघांची जबानी नोंदवून त्यांना जाऊ दिलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close