शाशकीय

डीजे वाजवीत असताना शासकीय नियमाचे  पालन करा अन्यथा कारवाई – ठाणेदार अजय अहिरवार

Spread the love

 

चांदुर रेल्वे ( ता. प्र.)
प्रकाश रंगारी
विवाह प्रसंगाच्या वेळी मिरवणूक काढताना आणि काही उत्साह जास्तीत जास्त डेसिबल आवाज केल्यानंतर डिजे वाल्यावर होणार कारवाई न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार जरा आवाज ठेवला नाही. किंवा डीजे नियमानुसार डेसिबल मध्ये वाजविला नाही. तर पोलीस प्रशासन त्या डीजेवाल्यावर कारवाई करणार असे ठाणेदार अजय अहिरवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. चांदुर शहर व तालुक्यामध्ये होणारे विवाह,, जयंती, दुर्गा, गणपती विसर्जन, तथा मंगल कार्यालयामध्ये रात्री दहा नंतर डीजेचा खूप मोठा आवाज आढळून आल्यास त्यांच्यावर पोलिस प्रशासन कारवाई करणार. संबंधित डीजे संचालक, मंगल कार्यालय मालक, सार्वजनिक उत्सव समिती, यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार. सर्वच होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अत्याधुनिक डीजेचा वापर केल्या जातो. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासन यानंतर बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करणार आहे. जयंती,विवाह, दुर्गा, गणपती विसर्जन असो यामध्ये कानाला बहिरेपणा येईल इतका खूप मोठा आवाज असतो. यावर हायकोर्टाने नियम घालून दिलेले आहेत. मोठ्या आवाजामध्ये डीजे वाजविणाऱ्या वर पोलीस प्रशासन कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. अशी माहिती ठाणेदार यांनी दिलेली आहे. मोठ्या कर्कश आवाजामुळे गर्भवती महिला, सत्तर वर्षाच्या पुढील बुजुर्ग म्हाताऱ्यांवर लहान मुलांवर यांचा हार्ट वर दुष्परिणाम होतो. नियमानुसार 60 ते 65 डेसिबल पर्यंत आवाज असला पाहिजे. परंतु तसे न राहता 80 ते 100 डेसिबल पर्यंत आवाज केल्या जातो. 100 डेसिबल पर्यंत जर आवाज केला तर कानाची ऐकण्याची क्षमता नष्ट होते. कानातील पडदे पाठवू शकतात. हृदयावर परिणाम होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो. कर्कश आवाज ऐकवला तर मानसिक संतुलन सुद्धा बिघडू शकते. रक्तदाब असलेल्यांचा मृत्यू होऊ शकतो
ज्यांना हृदय रोगाचा त्रास आहे अशांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पंचांग ते 65 डेसिबल आवाजामध्ये मंगल कार्यालयामध्ये डीजे वाजवू शकतात. परंतु शासकीय कार्यालय, रुग्णालय, शाळा, कॉलेज परिसरामध्ये आवाज कमी असला पाहिजे. या परिसरामध्ये जर कोणताही डीजेवाला नियमाचे उल्लंघन करेल तर त्या डीजेवर पोलीस प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close