क्राइम
या कारणाने पित्याने स्वतःच्याच मुलाला शितपेयात विष घालून मारले

सोलापूर / नवप्रहार मिडिया
मुलं म्हटलं की तेथे धिंगामस्ती आलीच. तुम्ही मुलांना कितीही ओरडले तरी त्यांना मस्ती करण्यापासून थांबवने म्हणजे तारेवरची कसरत. जेव्हा पासून मोबाईल आला तेव्हा पासून तर मुलांना मोबाईल खेळण्यापासून रोखणे हे अशक्य झाले आहे. काही वेळा मुलांचे आई वडीलच मुलांनी शांत बसावे म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देतात. पण हाच मोबाईल एका चिमुकल्या साठी जिवाचा वैरी बनला आहे. मुलगा वारंवार मोबाईल मागतो म्हणून बापानेच स्वतः च्याच मुलांना कोल्ड ड्रिंकमध्ये विष घालून जीवे मारल्याचे दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर शहर हे सोमवारच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटनानी हादरून गेले आहे.
सोलापूर-तुळजापूर हायवे रोडवरील सर्विस रोडलगत नाल्याजवळ एक लहान मुलाचा मृतदेह आढळला होता. संबंधित माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी तत्काळ मुलाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले असता त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं होतं. पोलिसांनी तपास केला असता त्या मुलाची ओळख विशाल विजय बट्टू (वय- 14 वर्षे, राहणार भवानी पेठ सोलापूर) अशी पटली.
आपल्या राहत्या घरातून तो सायंकाळी घराबाहेर पडला होता. पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि घरापासून ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. पोलिसांच्या तपासात स्वतः फिर्यादीचे पती म्हणजेच मयत मुलाचे वडील यांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मयत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीने दिलेली माहिती अशी की, मुलगा विशाल हा शाळेत व शेजारील लोकांच्या सतत खोड्या काढायचा. त्याच्या शाळेतील सततच्या तक्रारी, अभ्यास न करणे, घरात व शाळेत खोड्या काढणे, सतत मोबाईल पाहणे याचा राग मनात धरून त्यांनी त्याला थम्सअपमध्ये सोडीयम नायट्रेटची विषारी पावडर मिसळून जिवे ठार मारल्याची कबुली बापाने दिली आहे. सदर गुन्ह्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भादवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून यापुढील तपास पोनि जगताप हे करत आहेत.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |