मैत्रिणीने मैत्रिणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले.

लग्नासाठी तिने केला होता लिंग बदल
मदुराई / नवप्रहार वृत्तसेवा
त्या दोघी एकाच कॉलेज मध्ये शिकत असल्याने त्या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या नेहमी सोबत असायच्या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले हे दोघींनाही कळले नाही. अश्यतच त्यांनी लग्न करण्याचा निर्धार केला.त्यामुळे त्यापैकी मुरगेश्वरी ने लिंग बदल केला. पण लग्नाच्या वेळी अचानक कथेत ट्विस्ट आला. मैत्रीण नंदिनी ने लग्नास नकार दर्शविला. त्यामुळे मुरगेश्वरी च्या मनात नंदिनी बद्दल द्वेष निर्माण झाला होता. आणि तिने धक्कादायक कृत्य केले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृरुगेश्वरी आणि आर नंदिनी या कॉलेज काळा पासून चांगल्या मैत्रिणी होत्या.त्या नेहमी एकत्र राहायच्या. हळूहळू त्यांची मैत्री कधी प्रेमात पडल्या हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. त्यानंतर त्यांनी आपसात लग्न करण्याचे ठरवले. त्यामुळे
मृरुगेश्वरी ने लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला.
लिंग बदल केल्यानंतर जेव्हा मृरुगेश्वरी ने नंदिनी ला लग्नाची आठवण करुंदीकि तेव्हा तिने लग्नास स्पष्ट नकार दर्शविला. नंदीनेने नकार दर्शविल्याने मृगेश्वरीच्या मनात नंदिनी बद्दल राग खदखदत होता. ती नंदिनी ला धडा शिकवण्याची संधी शोधत होती. जशीच तिला संधी मिळाली तिने नंदिनी च्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले.