सामाजिक

जागतिक फार्मासिस्ट दिन पुसद येथे उत्साहात साजरा

Spread the love

 

राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी पुसद

पुसद औषधी विक्रेता संघ पुसदच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनाचे आयोजन व्यापारी भवन, दवा बाजार पुसद येथे करण्यात आले. होते.

या कार्यक्रमाला पुसद मधील सर्व फार्मासिस्ट उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आरोग्य देवता धन्वतंरी मातेचे पुजन करून करण्यात आली.

या कार्यक्रमाला जिल्हा संघटन सचिव श्री.सुरज डूब्बेवार, अध्यक्ष रवि पदमवार, सचिव श्री सुशांत महल्ले, कोषाध्यक्ष श्री राहुल डूबबेवार, उपाध्यक्ष श्री संतोष तडकसे , गजानन गादेवार, रणवीर टाले, के. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राऊड टू बी फार्मासिस्ट या विषयावर श्री सुरज डूब्बेवार यांनी अतिषय अनमोल मार्गदर्शन केले समाजात फार्मासिस्ट, केमिस्ट ला आरोग्य दूत म्हणुन ओळख निर्माण झाली पाहिजे या कार्यक्रमा मध्ये पुसद मधील सर्व केमिस्ट बांधवांना ऍप्रॉन चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रवि पदमवार यांनी केले. सूत्रसंचालन ,व आभार प्रदर्शन श्री सुशांत महल्ले यांनी केले.
कार्यक्रमाला पुसद येथील सर्व फार्मासिस्ट उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close