सामाजिक
पिपरी येथे जिवंत विजेच्या ताराच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू
शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान
वडणेर प्रतिनिधी
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे जिवंत विजेच्या ताराच्या स्पर्शाने बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी ५ ऑगस्टला घडली असून यात शेतकरी जयंत धाडवे यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार आज शनिवारी शेतकरी जयंत धाडवे याचा बैल चरत असतांनाच खाली लोबंत असलेल्या जिवंत विजेच्या ताराच्या त्याला स्पर्श होताच बैलाचा जागीच मृत्यू झाला या संबंधी शेतकऱ्याने वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1