क्राइम

मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख वाढवून लैंगिक अत्याचार 

Spread the love

नागपूर / प्रतिनिधी 

                 मैत्रिणीच्या माध्यमातून तू मला खूप आवडते असे म्हणत १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला एका ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. आणि वाच्यता केल्यास गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल अशी धमकी दिली होती. घाबरलेल्या पीडितेने कोणाला. हा प्रकार सांगितला नाही. पण  तरुणाकडून वारंवार त्रास होत असल्याने तिने याबाबत आपल्या वडिलांना सांगितले. वडिलांनी तरुणीला घेत  याबाबत नंदनवन पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला.समीर शेख (वय २०, रा. सक्करदरा) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आरोपीशी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने तिला आवडत असल्याचे सांगून मैत्री वाढविली. त्यानंतर तिला एका ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.

यामुळे घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र, आरोपीकडून वारंवार त्रास होत असल्याने अखेर तिने वडिलांना माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घरी येऊन टाकला दबाव पीडितेच्या तक्रारीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी आरोपी तिच्या घरी आला.

त्याने गर्भधारणा चाचणी करण्यासाठी किटचा वापर करण्यास तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप केला. या घटनेनंतर पीडिता मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली. अखेर तिने नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा, लैंगिक अत्याचार आणि धमकीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close