सामाजिक

युवकाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

Spread the love

 

वरूड/तूषार अकर्ते

वरूड शहरातील युवकाने दि.८ जुलै रोज शनिवारवला विठ्ठलवाडी ले-आऊट मधील शेत सर्वे क्रमांक ३५७ भाग दोन मधील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली असल्याची घटना दि.८ जुलै रोज शनिवार ला दुपारी ४ वाजता च्या दरम्यान उघडकीस आली आहे.
प्राप्त माहिती नुसार राहुल सुधाकरराव लेकुरवाळे वय (३४) रा.वरूड यांने वरूड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. या मध्ये त्यांनी असे म्हटले आहे की आम्हाला आई वडील नसल्याने आम्ही तीन भाऊ असुन एकत्र राहतो व सर्वजन मजुरीचे काम करतो. मी मोठा असुन मधला भाऊ स्वप्नील सुधाकरराव लेकुरवाळे व लहान भाऊ सुमित आमचे तिघांचेही लग्न झाले नाही. माझा मधला भाऊ स्वप्नील हा मॅकेनीकल असुन गणेश गॅरेजमध्ये काम करीत होता. तो तीन ते चार दिवसापासुन सारखा दारू पित होता व माझे लग्न होत नाही, माझे वय झाले आहे असे सारखा बडबड करून विचारात राहत होता. दि.७ जुलै रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास स्वप्निल घरून जेवन करून कामावर गेला होता.तर मी दुपारी त्याच्या दुकानाकडे गेलो असता तो मला गॅरेज मध्ये आढळून आला नाही. रात्र झाल्यावरही तो घरी न आल्याने मी व माझा लहान भावाने त्याला वरूड मधील दोन, तीन चौकात शोधले परंतु तो आढळून आला नाही. दि.८ जुलै रोज शनिवार ला दुपारी ४ वाजता च्या दरम्यान माझा मित्राच्या मोबाईलवर त्याच्या मित्राचा कॉल आला व त्याने सांगितले की माझा भावाने विठ्ठल वाडी ले ऑउट शेत सर्वे नंबर ३५७ भाग दोन मधील विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केली आहे. अशी माहीती मिळाली असता मी तेथे गेलो व लोकांच्या मदतीने त्याला विहीरी बाहेर काढले. माझा भाऊ मृतक स्वप्नील सुधाकरराव लेकुरवाळे (३०) रा.वरूड यांचे वय झाल्याने तसेच त्याचे लग्न होत नसल्याने तो सारखा दारूचे नशेत राहत होता. मृतक याने लग्न न झाल्याचे विवचेनत राहुन दारूचे नशेत स्वःताच विहीत उडी घेवुन आत्महत्या केली आहे.
अशा फिर्यादी वरून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close