सामाजिक
वडिलांच्या देशसेवेचा वसा घेत तो झाला भारत भूमीच्या रक्षणासाठी सज्ज

आज धामणगावात होणार जंगी स्वागत
सैनिकाचा मुलगा झाला भारतिय वायुसेनेत पायलट
मंगरूळ दस्तगीर येथील माजी सैनिकाच्या पुत्राची भरारी
धामणगाव रेल्वे, /यशवंत पाटील
. :- आपल्या वडीलांनी भारतिय सेनेत सेवा देवून देश सेवा केली.वडिलांच्या या देशसेवने प्रेरित होऊन तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील एका जिद्द आणि चिकाटीमुळे भारतिय वायू सेवेत पायलटचे प्रशिक्षण पुर्ण केले आहे.या युवकाचे नाव प्रतिक विजय कुकुडकर आहे.
तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील विजय कुकुडकर यांची हे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होते.दरम्यान त्यांनी 1991 मध्ये भारतिय सेनेमध्ये दाखल झाले.त्यांनी तब्बल 31वर्षे सेवा केली.वडिलांच्या सेवेने प्रेरित होऊन त्यांचा एककुलता एक मुलगा प्रतिक कुकडकर त्यांने भारतिय सेनेत भरती होण्याचे ठरविले.त्यानूसार प्रतिकचे चौथी पासुन बारावी पर्यंतचे शिक्षण वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षण झाले.याकरिता त्याची आई निलिमा कुकडकर यांची मोलाची साथ मिळाली.त्यानंतर प्रतीकने विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले.त्यानंतर त्याची भारतिय वायू सेनेत निवड झाली.भारतीय वायुसेना मध्ये पायलट या पदावर निवड झाल्यावर त्याचे हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरु झाले.आता हे प्रशिक्षण 18 जूनला संपणार आहे.वडिलांच्या या देशसेवने प्रेरित होऊन प्रतीकने देशसेवेचे व्रत स्वीकारल्या बद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.
——-
पायलट पुत्राचे होणार जंगी स्वागतकॅप्टन विजय कुकुडकार, मंगरूळ दस्तगीर यांचा मुलगा प्रतीक विजय कुकुडकर यांची भारतीय वायुसेना मध्ये पायलट या पदावर निवड झालेली असून त्यांचे प्रशिक्षण दिनांक 18 जून 2023 हैद्राबाद येथे संपत असून त्यांचे 20 जून 23 रोजी दुपारी 2 वाजता धामणगाव येथे ट्रेन द्वारे आगमन होत आहे.या निमित्त माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था धामणगाव रेल्वे कडून जंगी स्वागत व अमर भगतसिंह चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.दिलीप दगडकर,माजी सैनिक,संघटकमाजी सैनिक बहुउद्देशीय संस्था धामणगाव रेल्वे—–
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1