क्राइम
अखेर मृतकाला मिळाला न्याय. ; ‘ एक फुल दो माली ‘ ठरले खुनाचे कारण

मोर्शी पोलिसांच्या सखोल आणि तंत्रशुद्ध तपासामुळे गवसला खुनी
मोर्शी / संजय गारपवार
माळू नदीच्या पुलाखाली सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुन्याला जेरबंद करण्यात मोर्शी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तांत्रिक तपास केल्यावर अनेक बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास करून हे यश मिळविले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की दि. 5 जून 2023 रोजी मोर्शी- वरुड रोडवरील माळू नदीच्या पुलाखाली पाण्यात एक प्रेत तरंगतांना आढळून आले होते. मायवाडी गावातील पोलीस पाटील नामे हरिविजय दिगांबर गेडाम यांनी दिलेल्या फिर्यादवरुन मर्ग नं. ०३/२०२३ कलम १७४ जा. फौ प्रमाणे दाखल करुन पि.एम. तसेच इतर कारवाई करण्यात आली. नमुद अनोळखी इसमाची ओळख पटविण्यासाठी शोध पत्रीका तयार करण्यात आली. त्याच्या मदतीने मृतकाची ओळख पटविण्यात आली असता सदर मृतक याचे नाव समिर ऊर्फ राज श्रावण उईके, वय २० वर्ष, रा. येडापुर, ता. मुलताई, जि. बैतुल (मध्य प्रदेश) असे निष्पन्न झाले.
सदर प्रकरणात संशय निर्माण झाल्याने त्या दिशेने तपास करुन मृतक मृतकचा मित्र नामे परसराम दंम्मु वरकडे, रा. कुंडा बोरगाव, यांचे मोबाईल क्रमांकाचे सि. डी. आर. एस. डी. आर. प्राप्त करुन तसेच इतर तांत्रीक विष्लेशन करुन तसेच मृत्रकचा मित्र यास विश्वासात घेवुन त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सदर मर्ग मधिल मृतक याचे मरणास कारणीभूत असलेले संशयीत इसम नामे रोषण रमेश टाकरखेडे, रा. बाजारपुरा अंबाडा यास ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने कबुली दिली की त्याचे व मृतकचे एकाच मुली बरोबर प्रेम प्रकरण असुन त्या कारणावरुन त्याचा व मृतकचा दिनांक ०१/०१/२०२३ रोजी आठनेर येथे वाद झाला. त्या नंतर मृतक व त्याचा मित्र परसराम तसेच अंबाडा येथील रोषण टाकरखेडे व त्याचा मित्र असे चौघेजन मोटरसायकलने आठनेर येथुन मोर्शी येथे माळु नदीचे पुलावर आले.
ठिकाणी रात्री ०८.०० वा. चे सुमारास मुलीचे कारणावरून आरोपी रोषण टाकरखेडे व मृतक यांच्यामध्ये वाद झाला त्याच कारणावरुन आरोपी रोषण याने बाजुलाच पडलेल्या एका लोखंडी वस्तुने मृतकचे डोक्यावर मारुन त्याला जखमी केले व पुलावरुन नदीचे पाण्यात ढकलुन दिले. नंतर मृतक याचे सोबत असलेला मित्र परसराम याला तु सदर घटनेबाबत कोणालाही व पोलीसांना काहीही सांगीतल्यास आम्ही तुझा सुध्दा मडर करु अशी धमकी दिली. त्यामुळे ठिकाणावरुन पळुन गेला होता. परसराम जिवाच्या भितीने त्या सदर प्रकरणाच्या एकंदरीत तपासात तसेच तांत्रीक बाबींच्या विश्लेषनावरुन यातील मृतक यास संशयीत आरोपी नामे रोशन टाकरखेडे याने जिवाने मारुन टाकुन पुरावा नष्ट केल्याचे निष्पन्न झाल्याने व मृतकचा मित्र परसराव वरखडे याने पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्ट वरून सदर प्रकरणात अप.क्र. २४२/२०२३ कलम ३०२, २०१,५०६ (२), ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे रोषन रमेश टाकरखेडे, वय २२ वर्ष, रा. अंबाडा यास आज दिनांक ०६/०६/२०२३ रोजी अटक करुन वि.न्यायालयात हजर करुन दिनांक ०९/०६/२०२३ पावेतो पि.सी. आर प्राप्त करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक अमरावती ग्रा.. श्री. शशिकांत सातव, अप्पर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., डॉ. श्री. निलेश पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी, यांचे मार्गदर्शनात पो. नि. श्रीराम लांबाडे तसेच तपासी अधिकारी पोउपनि श्री. शरद भागवतकर व सोबत पोकॉ. सौरभ धरमठोक यांनी केलेल्या तांत्रीक विश्लेषनावरुन सदरचा गुन्हा उघड करण्यात आला आहे.