याला राग म्हणावं की आणखी काही ?
ग्वाल्हेर / नवप्रहार डेस्क
पती-पत्नीच्या नात्यात प्रेमाबरोबरच संघर्षाचाही समावेश असतो. या नात्यात लहान मोठी भांडणे ही लागलीच असतात. पणअनेक वेळा हा संघर्ष इतका वाढतो की दोघेही आपापले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात. पण नात्यातील काही चुका आयुष्य बदलून टाकतात. दरम्यान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एक विचित्र घटना समोर आली आहे, जिथे पत्नीशी भांडण झाल्यानंतर नवऱ्याने अख्खं घर पेटवून दिलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
इतकंच नाही तर त्याच्या मालमत्तेचा ढिगारा आगीच्या भक्ष्यस्थानी जळत असताना, व्हिडिओमध्ये तो माणूस त्याच्या घराबाहेर आरामात फिरताना, सिगारेट ओढताना दिसला. त्याची बेफिकीर वृत्ती पाहून शेजारीही अवाक् झाले. यानंतर शेजाऱ्यांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. यावेळी पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
नेमकं काय घडलं?
बहोदापूर परिसरातील आनंद नगरमध्ये राहणारे विवाहित जोडपे श्रीराम कुशवाह आणि त्यांची पत्नी रजनी कुशवाह यांच्यात अनेक दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. बुधवारी आणखी एक वाद उफाळून आला, जो इतका वाढला की पतीने त्याच्या घरातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्ससह घरातील सर्व वस्तू घराबाहेर फेकून दिल्या आणि त्यांना आग लावली. ही आग त्यानं आपला राग व्यक्त करण्यासाठी लावली होती. त्यानं गाडीतलं पेट्रोल काढलं या सामानावर शिंपडून पेटवून दिलं.पण ती आग हळूहळू इतकी वाढली की अख्खं घर जळून खाक झालं. सुदैवानं बायकोला काहीच दुखापत झाली नाही. कारण खिडकीतून येणारा धूर दिसताच ती घराबाहेर पडली होती. पण नवरा-बायकोमधील इवल्याशा भांडणामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं. घर तर गेलंच पण सोबतच सामानही जळून खाक झालं.
शेजाऱ्यांना शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय
आग लागल्यानंतर सुरुवातीला शेजाऱ्यांना शेजाऱ्यांना शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय आला. मात्र, पोलिसांच्या चौकशीत पत्नीशी भांडण केल्यानंतर रागातून पतीनेच गळफास घेतल्याचे समोर आले आहे. नंतर अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण आटोक्यात आणले. आग तातडीने विझवण्यात आली आणि जोडप्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले.त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला समज दिली आणि सल्ला दिला. या दाम्पत्यानेही आपली चूक मान्य करत भविष्यात अशा घटना टाळण्याचे मान्य केले.