हटके

२ हजार कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमवणाऱ्या वाघमारेला न्यायालयाचा दणका 

Spread the love

पुणे / विशेष प्रतिनिधी

येथील महानगर पालिकेतील  माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या कथित बेहिशेबी मालमत्ते संदर्भात मुंबई उच्चन्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत एसीबी का. या प्रकरणाची खुली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे राज्यातील लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून अधिकारी वर्गात खळबळ माजली आहे.

आयुक्तांना न्यायालयाचा दणका

न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजा भोंसले यांच्या खंडपीठाने पुणे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र ओढले आहेत. तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनी २०१९ मध्ये एसीबीची चौकशी रोखत वाघमारे यांना दिलेली ‘क्लीन चिट’ न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली. भ्रष्टाचार हा देशाचा शत्रू आहे. आरोपीला वाचवण्यासाठी आयुक्तांनी स्वतःच ‘मिनी ट्रायल’ चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

नेमकं प्रकरण काय?

सामाजिक कार्यकर्ते ॲड. तानाजी गंभीरे यांनी २०१६ मध्ये वाघमारे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. वाघमारे यांनी पदाचा गैरवापर करून पत्नी, भाऊ आणि काही बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने सुमारे २,००० कोटींची अपसंपदा गोळा केल्याचा आरोप आहे. प्राथमिक चौकशीत वाघमारे यांनी तपासात सहकार्य केले नव्हते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी अधिकाराबाहेर जाऊन समांतर चौकशी करत ही फाइल बंद केली होती.

न्यायालयाने या निकालाच्या अंमलबजावणीला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. याचिकाकर्ते ॲड. गंभीरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, प्रशांत वाघमारे यांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close