राजकिय
राहुल गांधी यांच्या शिक्षे विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे निवेदन
लोकशाही दाबण्याचा भाजपचा सरकार चा प्रयत्न राहुल गांधी यांना गुजरात कोर्टाने सुनावली 2वर्षा ची शिक्षा
चिमूर कॉग्रेस पार्टी कडून निषेध करून दिले निवेदन
चिमूर ता प्र,, ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर —-राहुल जी गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजप कडून आकांडतांडव सुरू असून त्यांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी गुरुवारी दिनांक 23 /3/ 2023 रोजी त्यांना कोर्टात दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली या घटनेचा व हुकूमशाही वृत्तीच्या भ्रस्ट मोदी सरकार व भाजपा मा.राहुल गांधी यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे भाजपने राहुलजी विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकविण्याचे षडयंत्र रचले आहे. अश्याच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुलजींना आज दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. भारतीय जनता पक्ष्याच्या या षडयंत्रविरोधात चिमूर कॉग्रेस पक्षा तीव्र निंदा करीत याचा जाहीर निषेध करीत, तसेच लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने चिमूर काँग्रेस कमिटी यांच्याकडून चिमूर तहसील ऑफिस पुढे घोषणाबाजी करून मोदी सरकारचा निषेध करण्यात आलाय व चिमूर चे तहसीलदार प्राजक्ताजी बुरांडे यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री डॉ. विजय पाटील गावंडे ,श्री प्रा राम राऊत सर महाराष्ट्र प्रदेश सेवादल सहसचिव, श्री अविनाश अगडे अध्यक्ष चिमूर शहर काँग्रेस ,श्री ओम प्रकाशजी खैरे उपाध्यक्ष तालुका काँग्रेस चिमूर, श्री नागेश चट्टे उपाध्यक्ष विधानसभा यु.कॉ.चिमूर, श्री बाळूभाऊ बोभाटे सचिव शहर काँग्रेस चिमूर, श्री विलास हरिभाऊ पिसे नेरी शिरपूर संपर्क प्रमुख, श्री प्रशांत डवले उपाध्यक्ष ओबीसी युवा काँग्रेस, देविदास मोहीनकर, धनराजजी मालके, राकेश साठोणे, तुषार शिंदे माजी.उपाध्यक्ष न.प.चिमूर ,सुधीर भोयर, दिलीप सुर ,नितीन कटारे माजी.नगर सेवक न.प.चिमूर ,योगेश अगडे इत्यादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.




