रामपूर शिवारात झाला प्रदिपचा खून. आरोपी अजून मोकाट.
आरोपी अजून मोकाट.
छोट्याश्या गावात एका वर्षात दोन खून.
.
मोहाडी.
मोहाडी तालुक्यातील रामपूर हे छोटेसे गाव पण या गावात एका वर्षात दोन खून झाले असून दि.22 मार्च रोजी रात्री 7.30 चे सुमारास प्रदीप लक्ष्मण धांडे 35 यांच्या डोक्यावर वारकरून त्याचा खून करण्यात आला.
मोहाडी तालुक्यातील रामपूर(मांडेसर)हे छोटेसे गाव या गावा जवळून सुर नदी वाहते या नदीत मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरू असते.
प्रदीप लक्ष्मण धांडे 35 यांचे शेत गावा पासून अर्धा की.मी.अंतरावर आहे. शेत खाली असल्या मुळे प्रदीप लक्ष्मण धांडे हा आपली गुरे शेतात बांधत होता.यातील काही गुरे दुधाळ असल्याने प्रदीप दररोज रात्री दूध काढून गुरांना चारा टाकून घरी येत होता.
दि.22 मार्च रोजी प्रदीप सायंकाळी शेतावर गेला दूध काढून गुरांना चारा टाकून घरी परत येत असताना मारेकऱ्यांनी प्रदिपच्या डोक्यावर वार करून खून केले.प्रदीप घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शेताकडे जाऊन बघितले असता शेतात प्रदीप मृत अवस्थेत आढळून आला याची सूचना मोहाडी पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत P.M. साठी पाठविले.
दि.23 मार्च रोजी दुपारी प्रदीप वर अंत्य संस्कार करण्यात आले.
पुढील तपास ठाणेदार प्रदीप पुल्लरवार .पो.उप. नि. दुधकावर पो. ह.त्रिमूर्ती लांडगे.दुर्योधन भुरे.सतिश सपकाळ करीत असून पोलिसांचे हात अजून खाली आहेत.