क्राइम

मोबाईलमधे डोकाऊन पाहल्याणे दोन गटात तुंबळ हाणामारी

Spread the love

घाटंजी पोलिसात दोन्ही गटावर विविध कलमान्वे गुन्हे दाखल.

घाटंजी तालुका प्रतिनिधी- सचिन कर्णेवार

तालुक्यातील राजुरवाडी येथे दिनांक २२ मार्च बुधवारला सकाळी मोबाईल च्या कारणावरून दोघात वाद झाला असता याचे प्रयावसन दोन गटात विभागणी होऊन दोन गटात हाणामारी झाली.यातील जागेश्वर मेंढे या इसमाला मारल्याने त्याला पश्चाताप झाल्याने त्याने विषारी औषध प्राषण केल्याची गांभीर घटना घडली.एकाच समाजातील राजुरवाडी येथे वास्तव्यास असणारे मोबाईल वरून माझ्या बाबतीत बोलत आहे व माझा मोबाईल का बघितला या कारणाने ह्या गोष्टीचे वादात पर्यावसन व हाणामारीत रुपांतर झाले ही घटणा पाहता पाहता दोन गट तयार होऊन चांगलाच राडा झाला. प्रथम एका गटाने घाटंजी पोलिसात तक्रार दिली तर दुसऱ्या गटातील जागेश्वर मेंढे यांनी मारण्याचा पश्चाताप घेऊन विषारी औषध प्राषण केल्यावरून बहुसंख्य नागरिकासह घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये येऊन फिर्याद नोंदवून गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.यात दोन्ही गटाची तक्रार असल्याने घाटंजी पोलिसांनी दोन्ही गटातील लोंकावर गुन्हे नोंद करून सदर प्रकरण तपासात घेतले आहे. फिर्यादी सागर नंदकिशोर हांडे वय ३२ वर्ष यांनी तक्रार दाखल केली असून मी घरासमोर उभा राहून त्यांचे सायखेडा येथील मित्र नितीन खडसे यांचे सोबत मोबाईल फोनवर बोलत असतांना गैरअर्जदार जागेश्वर सदाशिव मेंढे वय ४२ वर्ष हा दारूच्या नशेत येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करत फोनवर माझ्याबाबतीत का बोलतो!म्हणत वाद घातला यावरून वाद पेटला यात दुसरे सहभागी होऊन हाणामारी झाली.यावरून जागेश्वर मेंढे,सुरज मेंढे,गणेश मेंढे,अनुप पातोडे,अजय लाकडे,महेश लाकडे,एकनाथ फुंडे, सुधाकर मारवाडे,गजानन मारवाडे यांचेवर कलम१४३,१४७,१४९,३२३,२९४,५०६ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटाच्या फिर्यादी मंदा तुकाराम मारवाडे यांनी तक्रार दाखल केली असून घटनेच्या वेळी मी घरासमोर उभी असतांना सागर हांडे व त्यांचे वडील नंदू हांडे हे दोघेही मिळून जागेश्वर मेंढे यास शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करित होते.ही घटना काही उपस्थित महिला पुरुष गावकरी पाहत होते. अशातच हांडे यांचे नातेवाईक तिथे येऊन अश्लील भाषेत बोलून मारण्याचे बोलत होते.एवढ्यावरच न थांबता त्याला सर्वांनी मिळून लाथा बुक्क्यांनी मारून खाली पाडले. त्यांचे घरात पोलीस पाटील हे पद असल्याने ते दादागिरी करित असून त्याच कारणाने हा वाद सोडविण्यासाठी कोणीही गावकरी सरसावले नसल्याचे फिर्यादी ने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.जागेश्वर मेंढे यास मारहाण केल्याने त्याचा पश्चाताप घेऊन विषारी औषध प्राषण केले असून त्यांच्येवर यवतमाळ येथील शासकीय रुग्णाल्यात उपचार सुरु आहे.त्यांच्या फिर्यादिवरून सागर हांडे,नंदू हांडे,अरुण हांडे,आकाश हांडे,राहुल हांडे,यांचेवर कलम १४३,१४७,१४९,३२३,५०४ भादवी अन्वये गुन्हा नोंद करून सदर प्रकरणाचा तपासात घेऊन घाटंजी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुषमा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक निलेश कुंभेकर,विनोद मेश्राम हे पुढील तपास करित आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close