राजकिय

काकांच्या काका साठी पुतण्याने काकांना सोडले

Spread the love

धाराशिव / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                        अजित पवार यांनी राष्ट्रवादी पासून  काही समर्थकांसह वेगळे होत शिंदे फडणवीस सरकार  मध्ये एन्ट्री घेतली आहे. त्यांनी अनेपक्षीत एइत्या उचललेल्या  या पावलामुळे शरद  पवारांना मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत त्यांनी पुन्हा पक्ष बांधणीला सुरवात केली आहे. पण आताही कोण कोणाच्या बाजूने याचे चित्र स्पष्ट झाले नाही. असे असतांना भूम परांडा वाशीचे तीन वेळा आमदार राहिलेले  माजी आ.राहुल मोटे यांनी अजित दादा ऐवजी शरद पवारांना निवडले आहे. महत्वाचे असे की राहुल माटे आणि अजित दादा यांच्यात काका पुतण्याचे नाते आहे. 

 माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी पक्षात अजित पवाराच्या खूप जवळचे मानले जायचे. त्यांचा बाणगंगा कारखानादेखील अजित पवार यांनी भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतला आहे, असे असताना अजित पवारांनी बंड केल्यानंतर माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्धार केला आहे.

माजी आमदार राहुल मोटे यांची शरद पवारांना पसंती –  माजी आमदार राहुल मोटे यांनी आज धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यांनी शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यांच्या माध्यमातूनच विकास होऊ शकतो, असे सांगत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून जे संभ्रम अवस्थेत आहेत तेही आमच्या सोबत येतील असा विश्वास राहुल मोठे यांनी व्यक्त केला आहे.

तर आपण अजित पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचेदेखील राहुल मोठे यांनी माध्यमांना सांगितलं आहे. एकूणच राहुल मोठे यांच्या या भूमिकेने धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. राहुल मोठे हे अजित पवारांना साथ देतील असा अंदाज बांधला जात असतानाच त्यांनी शरद पवारांसोबत जात असल्याचे जाहीर केल्याने त्यांनी आपल्या काकाला सोडून दिल्याने अजित पवार यांच्यासाठी हा धक्का आहे.

 
 घड्याळ कोण बांधणार –   प्रत्यक्षात 10 महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होणार असून राष्ट्रवादीचे 2 तुकड्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर आता निवडणूक आयोगात पक्षाच्या चिन्हावरून लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चिन्ह कोणाकडे असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः महाराष्ट्रात, कारण राष्ट्रवादीचा महत्त्वाचा पाया महाराष्ट्रातच आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्रात विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत दोन्ही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजित पवारांच्या विरोधात लढण्याची रणनीती ठरवण्यात गुंतले आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close