सामाजिक

उद्धव ठाकरे याचा वाढदिवस रक्तदानाने साजरा

Spread the love

 

अनेक शिवसेनेच्या कार्यर्केत्यांनी केले रक्तदान.
नेर:- नवनाथ दरोई
ईशाळवाडीत दगड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून अनेकांच्या बळी गेला. ही घटना मन हेलावून सोडणारी असल्यामुळे, अशा दुःखद प्रसंगी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करू नये अशी उद्धव ठाकरे यांची सर्व कार्यकर्त्यांना तंबी असल्यामुळे नेर येथील शिवसेना कार्यालयात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला कुठलेही बॅनरबाजी न करता शिवसेना कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी यवतमाळ येथील एकनील ब्लड बँकेचे डॉ. रोहित मेश्राम, डॉ, पूजा, डॉ.पवन किनके, डॉ. प्रवीण किनके, डॉ. विकी थोटे यांना प्राचारण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता युवा सेना जिल्हाप्रमुख संकेत ठाकरे, शहर प्रमुख खुशाल मिसाळ, बंडू देशमुख, अंकुश नारिंगे,गोपाल चव्हाण, मनोज शेंदूरकार, वंदना ऊके यांनी अथक परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close