क्राइम

१७ वर्षाच्या बलात्कार पीडितेने साश्रू नयनांनी सांगितली पोलिसांना आपली आपबिती

Spread the love

पोलिस असल्याचे भासवून बलात्कार केल्याचे बयानात सांगितले

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी 

               वाढदिवस असल्याने मित्रासोबत कालकाजी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या १७ वर्षीय बलात्कार पीडित तरुणीने आपली आपबिती पोलिसांना सांगितली. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. त्या तिघांनी मानेवर चाकू लावून आणि पोलीस असल्याचे भासवून आपल्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याचे तिने आपल्या बयानात म्हटले आहे.

ज्यावेळी पीडिता आणि त्याचा मित्र बाकावर बसून वेफर्स खात होते त्यावेळी तीन तरूणांनी पोलीस असल्याचं भासवून या दोघांना मंदिराजवळ असलेल्या आस्था कुंज पार्क या ठिकाणी नेलं. तिथे तरूणाला मारहाण करण्यात आली आणि अल्पवयीन तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून या मुलीवर बलात्कार करण्यात आला. या घटनेने दिल्ली हादरली आहे. या प्रकरणात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी या मुलीने आपबिती सांगितली आहे.

पीडितेने पोलिसांना काय सांगितलं?

पीडितेने पोलिसांना सांगितलं की माझा २१ सप्टेंबरला वाढदिवस होता. त्यामुळे मी माझ्या मित्रासह कालकाजी मंदिरात मेट्रोने गेली होती. साधारण ७ वाजण्याच्या दरम्यान आम्ही एक वेफरचं पाकिट आणि पाणी बॉटल विकत घेतली होती. कालकाजी मंदिरात दर्शन झाल्यानंतर जवळ असलेल्या आस्था पार्कमधील एका बेंचवर बसून आपण वेफर खाऊ आणि मग इस्कॉन मंदिरात जाऊ असं मी माझ्या मित्राला सांगितलं. ज्यानुसार आम्ही एका बेंचवर बसून वेफर खात होतो. तेवढ्यात तिघेजण तिथे आले. त्यांनी माझ्या मित्राला खेचलं आणि त्याला थोबाडीत मारली. ज्यानंतर आम्ही त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात? ज्यावर आम्ही पोलीस आहोत आणि तुम्ही पार्कमध्ये कसे आलात हे विचारायला आलोय. तसंच या मुलीने पुढे सांगितलं की तिघांपैकी एकाने माझ्या मित्राला बाजूला नेलं आणि इतर दोघांनी आमचे मोबाइल जप्त केले. त्यातल्या दोघांनी मला झुडुपांच्या मागे चल असं सांगितलं. मी ज्यामुळे खूप घाबरले. मी म्हणाले की मला फोन द्या आईशी बोलायचं आहे. तेवढ्यात त्या तिघांपैकी एक जण ओरडला आसिफभाई गन निकाल. असं या मुलीने पोलिसांना सांगितलं.

आसिफने आधी मला लाल रंगाच्या बेंचवर नेलं आणि..

 

ही मुलगी पुढे म्हणाली आसिफ नावाच्या त्या तरूणाने जांभळा शर्ट परिधान केला होता. त्या तिघांमध्ये तोच सर्वात बळकट दिसत होता. त्याने त्याच्या खिशातून बंदूक काढली आणि ती ठेवली. त्यानंतर या तिघांपैकी एकाने माझ्या मानेवर चाकू ठेवला आणि मला अंधाऱ्या जागेत नेलं. असं या मुलीने पोलिसांना सांगितलं. FIR मध्ये दिल्यानुसार आसिफने या पीडितेचे कपडे काढले आणि तिला अंधाऱ्या जागेत असलेल्या लाल बेंचवर नेलं. तसंच इतर दोघांना कुणी येत नाही ना? हे लक्षा ठेवायला सांगितलं. त्यानंतर या मुलीने सांगितलं की आसिफने तिच्यावर बलात्कार केला. चाकू मानेवर लावून त्याने माझ्यावर अत्याचार केले हे सांगताना या मुलीच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. तिने रडतच ही सगळी क्लेशदायक आणि नकोशी आठवण पोलिसांना सांगितली. त्यानंतर हेमू अशी हाक त्याने मारली तो तिकडे आला. त्याने मला दुसऱ्या बेंचवर नेलं आणि तिथे माझ्यावर बलात्कार केला. त्यावेळीही त्याने चाकू माझ्या मानेवरच ठेवला होता. त्या नराधमाने दिपू अशी हाक मारली तो तिकडे आला, त्यानेही माझ्या मानेवर चाकू ठेवून माझ्यावर बलात्कार केला. तसंच मला मारहाणही केली अशी आपबिती या पीडितेने सांगितली.

ठार मारण्याची धमकीही आऱोपींनी दिली

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्या आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला तातडीने कपडे घालण्यास सांगितले. त्या मुलीला तिची जीन्स आणि तिचा टीशर्ट दिला आणि तो लवकर घाल असं सांगितलं. त्यानंतर पीडितेच्या मित्राला एकजण घेऊन आला. यानंतर या दोघांचेही मोबाइल फोन परत देण्यात आले. तसंच आत्ताच्या आत्ता हे पार्क सोडून निघा असं त्यांना बजावण्यात आलं. जे काही घडलंय त्याची वाच्यता कुणाकडे करशील तर तुला आम्ही ठार करू अशी धमकीही या तिघांनी पीडितेला दिली. पार्कमधून बाहेर पडल्यानंतर या मुलीने तिच्या मित्राला काय घडलं आहे ते सांगितलं. त्यानंतर या दोघांनीही तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली असंही या मुलीने सांगितलं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close