17 वर्षानंतर उलगडले खोट्या मृत्यूचे रहस्य
स्वतः च्या मुलाच्या जागी जाळले दिव्यांग तरुणाला
दानकौर (गुजरात )/ नवप्रहार मीडिया
सुविधांचा फायदा गैरकायदेशिर रित्या कसा उचलता येतो यासाठी अनेक लोक प्रयत्नशील असतात. आणि कुठल्यातरी कलुप्तीचा वापर करत ते त्याचा फायदा उचलतात.पण ज्या प्रमाणे म्हटल्या जाते की सत्य फार काळ लपून राहत नाही आणि ते आज न उद्या बाहेर येतोच. त्याची प्रचिती गुजरात क्या लोकांना आली आहे.
विम्याची रक्कम हडपण्यासाठी ऐका व्यक्तीने आपल्या मुलाच्या जागी एका दिव्यांग तरुणाला जिवंत जाळले. आणि विम्याचे 90 लाख रु. हडपले. पण कुटुंबात पैश्यावरून वाद झाल्याने काकाने पुतण्याच्या मृत्यूचे रहस्य उलगडले आहे. 17 वर्षानंतर पुन्हा या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.बातमिलीहेस्तोवर आरोपी फरार असल्याचे कल्लते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद क्राइम ब्रँच पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अनिल मलिक आणि त्याचे वडील विजयपाल हे आरोपी दानकौर शहरातील परसौल गावचे रहिवासी आहेत. मालमत्तेच्या वादातून अनिलचे काका धरमपाल यांनी हे गुपित पोलिसांसमोर उघड केले. त्यांनी सर्वप्रथम नोएडातील गौतम बुद्ध नगरच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली, मात्र पोलिसांनी हे प्रकरण मागे टाकले होते.
नोएडा पोलिसांनी कारवाई न केल्यावर धरमपाल यांनी अहमदाबाद क्राइम ब्रँचला अनिल जिवंत असल्याची माहिती दिली. क्राइम ब्रांच पोलिसांनी तपास केला असता सत्य समोर आले. अनिलचे मास्टरमाईंड वडील विजयपाल यांनी विमा कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा कट रचल्याचे उघड झाले.