हटके

उमर पचपन की काम बचपन का ! 

Spread the love

म्हाताऱ्या ची जागा पकडण्यासाठीची धडपड पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही 

               सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही तर तुम्हाला खळखळून हसायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. या व्हिडिओत एक आजोबा एसटीत जागा पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करतांना दिसतात. चला तर पाहू या प्रकरण काय आहे. 

अनेकदा एसटी आणि रेल्वेत इतकी गर्दी असते की, लोकांना बसायला सीटसुद्धा मिळत नाही. अनेक किमी त्यांना उभे राहून प्रवास करावा लागतो. त्यामुळे गाडी आली की अनेक लोक आपला दुपट्टा, रुमाल किंवा अन्य वस्तू सीट वर ठेवून ती जागा आमची आहे. असा आव आणतात. ईथपर्यंत तर ठीक होते. पण जागा पकडण्यासाठी खिडकीतून घुसने आणि ते ही आजोबाने असे सहसा घडत नाही.पण यावेळेस तसे घडले.आणि पुढे झाले असे .

त्यामुळे अनेक जण सीट पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक आजोबा सीट पकडण्याच्या नादात खिडकीतून एसटीत शिरले अन् पुढे जे झाले ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला की बसस्थानकावर अनेक एसटी थांबलेल्या दिसतील. व्हिडीओत दिसेल की, एका एसटीमध्ये प्रवासी ढताना दिसत आहेत; तर एक आजोबा या एसटीमध्ये सीट पकडण्यासाठी चक्क खिडकीतून आत शिरताना दिसत आहेत. पण पुढे या व्हिडीओत दिसते की, आजोबा खिडकीत अडकतात. तेव्हा तेथील काही प्रवासी खिडकीत अडकलेल्या आजोबांची सुटका करतात. आजोबा खिडकीत अडकलेले पाहून एक तिकीट कंडक्टरसुद्धा त्यांना पाहायला येतो आणि सीट पकडण्यासाठी आजोबांनी केलेला जीवाचा आटापिटा पाहून हसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

lalpari_lover_5151 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर अनेक युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “भारतात काहीही होऊ शकतं.” एका युजरने लिहिले, “धोतरात पाय अडकला असावा बहुतेक.” आणखी एका युजरने लिहिले, “म्हातारपणात कशाला एवढा आटापिटा करायचा?”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close