क्राइम

सरणावर ठेवला होता मृतदेह तितक्याच पोहचले पोलिस आणि खाली उतरवला मृतदेह 

Spread the love

पानीपत / विशेष प्रतिनिधी

 हरियाणाच्या पानीपत येथील साई कॉलनीत एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या महिलेच्या पतीकडून पत्नीवर गुपचूप स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्याची भनक मुलीच्या कुटुंबाला लागली आणि ते पोलिसांना घेऊन तातडीने स्मशानभूमीत पोहचले.

पोलिसांनी या महिलेचा मृतदेह चितेवरून काढून पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे.

माहितीनुसार, मृत महिलेचे नाव पूनम असून ती २० वर्षांची आहे. पूनम आणि विशू यांचे १ वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झाले होते. पूनमच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्मशानभूमीत जात पूनमचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी आणखी एक गंभीर माहिती समोर आली आहे. मुलीने लव्ह मॅरेज केल्यामुळे पूनमच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. पोलिसांनी आता पूनमच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.

पूनमचे तिच्या सासरी वाद होते. या वादातून दोघं पती पत्नी वेगळे राहत होते. ३ दिवसांपूर्वी पूनम विषारी औषध प्यायल्याने किचनमध्ये पडली होती. तिला रोहतकच्या पीजीआय रूग्णालयात दाखल केले. जिथे उपचारावेळी तिचा मृत्यू झाला. तर विशुने लहान वयातच लग्न केले होते. सासरच्यांनी पूनमवर उपचारही ठीक केले नाहीत. हे हुंड्याचे प्रकरण आहे. मुलीने प्रेमविवाह केला होता. तिच्या अंत्यसंस्काराला तिघेच जण होते, माहेरच्यांनाही काही सांगितले नव्हते. त्यामुळे कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी वकील नरेंद्र भिवान यांनी केली आहे.

दरम्यान, लव्ह मॅरेजनंतर आमच्या वडिलांनी जीव दिला होता. माझ्या बहिणीची हत्या करण्यात आली आहे. मला एकदा बहिणीचा फोन आला होता. ती खूप रडत होती असा दावा पूनमच्या भावाने केला आहे. तर तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोस्टमोर्टम रिपोर्टनंतरच चित्र स्पष्ट होईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close