क्राइम

कार मध्ये सापडलेला मृतदेह हा अपघात नव्हता  तर होता घातपात

Spread the love

जालना / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

               जालना जिल्ह्यात तळणी- मंठा गावात कार मध्ये जळालेल्या स्थितीत सापडलेला मृतदेह हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पत्नीला मुलबाळ होत नसल्याने पतीने रागाच्या भरात तिला पेटवून दिल्याचे कबुल केले आहे.

 जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 24 जून रोजी कारमध्ये आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. या कारला आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती. मूल होत नसल्याचा राग डोक्यात असल्याने पतीनंच हे भयंकर कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सविता अमोल सोळंखे असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून दोघांचं लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हतं. अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास द्यायचा. वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत होता. मात्र त्याला सविता नकार देत होती.

याचाच राग मनात धरून पती अमोलनं पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close